Gauri Khan सेलिब्रिटींपेक्षा श्रीमंत; नेटवर्थ जाणून बसेल धक्का, आईच्या मृत्यूनंतर किंग खान तिला शोधण्यासाठी दारोदारी का भटकला?

Shahrukh Khan Wife Gauri Khan Net Worth:  किंग खानची पत्नी गौरी खान ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमन आहे. फार कमी लोकांना माहित आहे की ती स्वत: कोट्यावधीची मालकीण आहे. 

Oct 08, 2024, 11:46 AM IST
1/10

दिल्लीतील पंजाबी कुटुंबातील गौरी खानचा आज (8 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. 54 वर्ष गौरी ही एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय इंटिरयर डिझायनर आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात केली आणि आज ती कोट्यावधीची मालकीण आहे. 

2/10

शाहरुख खान आणि गौरी यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. किंग खान गौरीला शोधण्यासाठी मुंबईत दारोदारी भटकला होता. एक वेळ अशीही आली होती त्याचा खिशातले पैसेही संपले होते. आज परफेक्ट कपल म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा लग्नाला 32 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. 

3/10

दिल्लीतील कॉलेजच्या दिवसांपासून शाहरुख खान आणि गौरी खान एकमेकांना डेट करत होते. पण काही कारणामुळे गौरी शाहरुखला सोडून दिल्लीतून मुंबईला आली. तेव्हा किंग खानला ती मुंबईत कुठे राहते माहिती नव्हतं. 

4/10

आईच्या निधनानंतर शाहरुख एकटा पडला होता. त्याने मुंबईत येऊन गौरीचा शोध घेण्याच ठरवलं. थोडे पैसे आणि एक कॅमेरा घेऊन शाहरुख मुंबईत आला. तो काळ सेफफोनचा नव्हता. त्यामुळे गौरीला शोधणं किंग खानसाठी कठीण गेलं. 

5/10

एक वेळ अशी आली की त्याचा खिशातील सर्व पैसे संपले. मग त्याने कॅमेरा विकला. मित्रासह तो गौरीचा शोध घेत होता. गौरीला समुद्रकिनारे खूप आवडत होते. त्यामुळे त्याने मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारे शोधणाच ठरवलं. 

6/10

त्यानंतर त्याने एका टॅक्सीवालाल्या त्याचा जवळचे सर्व पैसे दिले आणि सांगितलं. या पैशांचा हिशोबाने मीटर जिथे थांबेल तिथे गाडी थांबव. असं करत तो मड आयलंडवर गेला. तिथे तो किनाऱ्यावर गौरीच्या शोधतात फिरत होता. 

7/10

शेवटच्या दिवशी त्याला अचानक गौरी खान भेटली. या भेटीमध्ये दोघे एकमेकांना पाहून खूप रडले. त्यावेळी किंग खानला गौरीने आपल्यासोबत चल म्हणून म्हटलं. त्यावर तो म्हणाला माझ्याजवळ पैसे नाही. मित्रांनी त्याला पैसे दिले. 

8/10

त्यानंतर 25 ऑक्टोबर 1991 वर्ष दोघांनी लग्न केलं. त्या दोघांची पहिली भेट 1984 मध्ये झाली. त्यावेळी शाहरुख 18 वर्षांचा आणि गौरी फक्त 14 वर्षांचे होते. ते एका पार्टी भेटले होते. 

9/10

गौरीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर शाहरुखशिवाय गौरी चित्रपटांची निर्मिती करून मोठी कमाई करते. गौरीचेही एक रेस्टॉरंट असून त्यातून तिला करोडोंची कमाई होते. तर मुंबईशिवाय दिल्ली, अलिबाग, लंडन, दुबई आणि लॉस एंजेलिसमध्येही तिची आलिशान घरं आहेत. 

10/10

गौरीने करण जोहर, कतरिना कैफ ते मलायका अरोरा यांसारख्या स्टार्ससाठी घरं डिझाइन केलंय. गौरी खानची एकूण संपत्ती 1600 कोटींहून अधिक आहे. तर गौरीने बांधलेल्या एका दुकानाची किंमत 150 कोटी रुपये आहे.