Dua पासून ते Raha पर्यंत, 'या' 7 स्टारकिड्सची नाव आहेत युनिक, त्यांचा नेमका अर्थ माहितीये का?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना काहीच दिवसांपूर्वी कन्यारत्न झालं. दीपिका आणि रणवीरने लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलीचं नाव रिव्हील केलं असून ते अतिशय युनिक होतं. तेव्हा बॉलिवूडच्या अशा 7 स्टारकिड्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांची नाव खूप युनिक असून त्यांचा अर्थ सुद्धा खूप छान आहे. 

| Nov 02, 2024, 15:01 PM IST
1/7

आराध्या :

बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं नावं 'आराध्या' असं ठेवलं आहे. 'आराध्या' या नावाचा अर्थ पूजेच्या योग्य असणे असा होतो. 

2/7

दुआ :

अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या क्यूट कपलने त्यांच्या मुलीचं नाव 'दुआ' असं ठेवलंय. 'दुआ' या शब्दाचा अर्थ प्रार्थना असा होतो. 

3/7

राहील :

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा या दोघांनी आपल्या लहान मुलाचं नाव 'राहील' असं ठेवलं असून याच अर्थ नेहमी कार्यक्षम असणारा असा होतो. 

4/7

राहा :

बॉलिवूडच्या कपूर घराण्यातील रणवीर आणि आलिया या दोघांनी त्यांच्या लेकीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे. राहाचं नाव हे तिची आजी नीतू कपूर हिने ठेवलं असून याचा राहा या नावाचा अर्थ आनंद असा होतो. संस्कृतमध्ये राहाचा अर्थ वंश, बंगालीमध्ये याचा अर्थ आराम आणि आनंद आणि अरबीमध्ये याचा अर्थ शांती, आनंद आणि स्वातंत्र्य असा होतो.

5/7

वामिका :

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव 'वामिका' असं ठेवलं असून याचा अर्थ 'दुर्गा' असं होतो. 

6/7

अकाय :

विराट आणि अनुष्काच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'अकाय' असं असून याचा अर्थ 'चमकता चंद्र' किंवा  'चंद्राचं तेज' असा होतो.   

7/7

जेह आणि तैमूर :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लहान मुलाचे नाव 'जेह' आहे.  जेहचा अर्थ लॅटिनमध्ये ब्लू क्रेस्टेड बर्ड. तर पर्शियनमध्ये त्याचा अर्थ 'येणे, आणणे' असा होतो. सैफ - करीनाच्या मोठ्या मुलाचे नाव 'तैमूर' असून यावर मोठा वाद सुद्धा झालं आहोत.