FriendshipDay2024: मनोरंजन विश्वातील 'या' मित्रांच्या जोडीने चाहत्यांना पोट धरुन हसवलं
प्रत्येकाच्या आयुष्यात असा खास मित्र असतोच असतो,असेच मराठी सिनेविश्वातील मित्रांच्या जोडीने प्रेक्षकांना कधी हसवलं तर कधी डोळ्यात पाणी आणलं. आजच्या मैत्रीदिनानिमित्त या कलाकारांच्या मैत्री बद्दल जाणून घेऊयात.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. शाळेत परिक्षेला कॉपी करण्यापासून ते कॉलेजचं लेक्चर बुडवून कट्यावर कटींग पिण्यासाठी एक दोस्त पाहिजेच असतो.
1/8
सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ

'बनवाबनवी', 'आम्ही सातपुते', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'माझा पती करोडपती' या आणि अशा बऱ्याच सिनेमातून सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या जोडीने महाराष्ट्राला पोट धरुन हसवलं. ऑन स्क्रीनप्रमाणेच सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची खऱ्या आयुष्यातही तितकीच घट्ट मैत्री आहे. लवकरच ही जोडी 'नवरा माझा नवसाचा' सिमेनाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/8
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे

ओम भट्ट स्वाहा' आणि 'तात्या' विंचू हे फक्त नाव ऐकलं तरी प्रत्येक मराठी प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हसू येतं. झपाटलेला, 'धूमधडाका', 'पछाडलेला' या सिनेमातून महेश आणि लक्षा या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 'झपाटलेला' आणि 'पछाडलेला' या सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं. नुकतंच महेश कोठारे यांनी 'झपाटलेला 3' घोषणा केली. या सिनेमातून ते एआयच्या मदतीने महाराष्ट्राच्या लाडक्या लक्ष्याला पडद्यावर आणणार आहेत.
3/8
सलील कुलकर्णी आणि संदिप खरे

4/8
स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते

5/8
अश्विनी शेंडे आणि निलेश मोहरीर

'कळत नकळत','सुख कळले', 'तुजवीण सख्या रे' , 'एकाच ह्या जन्मी जणू' ते 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकांचे शीर्षकगीत अश्विनीने लिहिले तर संगीत निलेशने दिलं.. निलेश आणि अश्विनीच्या प्रत्येक गाण्यातून त्यांची मैत्री आणि सहकलाकार म्हणून एकमेकांवर असलेला विश्वास कायम दिसून येतो. 'भिजून गेला वारा', 'आभास हा', 'घन आज बरसे',' सावर रे मना', या गाण्यांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
6/8
वैभव तत्त्ववादी,पुजा सावंतआणि भूषण प्रधान

मराठी सिनेविश्वातील आघाडीचे कलाकार वैभव तत्त्ववादी,पुजा सावंत आणि भूषण प्रधान. हे तिघंही वैयक्तिक आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत. एका मुलाखतीत पुजा म्हणाली होती की, मी स्वप्नात रमणारी मुलगी आहे, वैभव आणि भूषण मला वास्तवात जगायला मदत करतात. त्यामुळे आमच्यात मैत्रीचं नातं खूप घट्ट आहे. या तिघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
7/8
स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर
