हनीमूनला जाण्यासाठी भारतीय क्रिकेटरने दिला राजीनामा, 28 वर्षांनी लहान मुलीशी केला होता विवाह

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर अरुण लाल यांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे. अरुण लाल यांनी त्यांच्या आयुष्यात दोन लग्न केली असून त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रीना होते. तर त्यानंतर अरुण लालने बुलबुल साहा हिच्याशी लग्न केलं. बुलबुलच्या लग्नानंतर अरुण साहा हे फार चर्चेत आले होते कारण तेव्हा अरुण 66 वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी बुलबुल ही त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान होती.   

| Oct 14, 2024, 17:16 PM IST
1/7

क्रिकेट चाहत्यांनी अरुण लाला हे नाव कधीना कधी ऐकलेच असेल. अरुण लाल भारताचे माजी क्रिकेटर असून त्यांची लव्ह स्टोरी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. अरुण लाल हे माजी क्रिकेट असण्यासोबतच क्रिकेट कॉमेंटेटरही होते. 

2/7

अरुण लाल यांचं पहिलं लग्न हे रीना यांच्याशी झालं होतं. त्यांनी दुसरं लग्न करण्यापूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीची परवानगी घेतली होती. अरुण लालने त्यांचं दुसरं लग्न त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मुलीशी केलं होतं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव बुलबुल साहा असं असून ती कोलकाताची राहणारी आहे. 

3/7

अरुण लालने वर्ष 2022 रोजी दुसरं लग्न केलं. अरुण यांनी पहिली पत्नी रीना हिच्याशी यापूर्वीच घटस्फोट घेतला होता. दुसरं लग्न करण्यापूर्वी  अरुण लाल बुलबुलला खूप चांगले ओळखत होते. 

4/7

दोघे अनेकदा एकमेकांना भेटायचे, मग हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली आणि मग दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. अरुणने त्याची पूर्व पत्नी रीना हिच्याकडूनही दुसरं लग्न करण्यापूर्वी परवानगी घेतली होती. रीनानेही त्यांना होकार दिला होता. 

5/7

2022  मध्ये अरुण लाल यांनी बुलबुल साहा हिच्याशी लग्न केलं. या लग्नानंतर अरुण फार चर्चेत आले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघांना हनिमूनला जायचे होते. पण अरुणकडे यासाठी वेळ नव्हता.

6/7

आरोग्याच्या समस्यांचे कारण देऊन अरुण लालने कोचिंग पदावरून राजीनामा दिला. त्यानंतर काही रिपोर्ट्स समोर आले ज्यात असं म्हंटलं गेलं की हनिमूनला जाण्यासाठी अरुण लालने राजीनामा दिला. तेव्हा अरुण हे बंगालच्या रणजी टीमचे कोच होते. 

7/7

अरुण लाल यांना भारताकडून जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी फक्त 16 टेस्ट सामन्यांमध्ये तर 13 वनडे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी 729 धावा तर वनडेत त्यांनी 122 धावा केल्या. यात टेस्ट सामन्यात त्यांचा सर्वाधिक स्कोअर 93 इतका होता.