'भारत का बच्चा-बच्चा जय श्री राम बोलेगा', मुंबई मेट्रोत ग्रुपच्या गाण्यावर पूजा भट्ट म्हणते 'असं करणं म्हणजे...'

Pooja Bhatt On Jai Shree Ram Song In Mumbai Metro : नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर राज करणारी अभिनेत्री पूजा भट्ट आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा पूजा भट्ट चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलीय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मुंबई मेट्रोत काही लोकं जय श्री रामचं गाणं गाताना दिसत आहेत. या व्हिडिओवर पूजा भट्टने आक्षेप घेतला आहे. 

| Oct 14, 2024, 17:12 PM IST
1/6

'भारत का बच्चा-बच्चा जय श्री राम बोलेगा', मुंबई मेट्रोत ग्रुपच्या गाण्यावर पूजा भट्ट म्हणते 'असं करणं म्हणजे...'

2/6

नव्वदच्या दशकात बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींपैकी पूजा भट्ट ही एक होती. आपल्या अभिनय कारकिर्दीत पूजा भट्टने अनेक सुपर हिट चित्रपट दिले.सध्या ती प्रसिद्धीपासून दूर असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. बॉलिवूडबरोबरच देशातील इतर मुद्द्यांवरही पूजा भट्ट आपली मतं मांडत असते.  पुजा भट्ट नुकतीच एका व्हायरल व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. 

3/6

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून एक ग्रुप मुंबई मेट्रोत  'भारत का बच्चा-बच्चा जय श्री राम बोलेगा' गाणं गाताना दिसत आहे. याबरोबरच हा ग्रुप गरब्याची गाणीही गाताना दिसत आहेत. पण अभिनेत्री पूजा भट्टने या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्विटर हँडलवर तीने यासंदर्भात एक पोस्ट शेअर  केली आहे. असं करणं म्हणजे सार्वजनिक जागेचा गैरवापर आहे. यांना रोखलं पाहिजे, असं पूजा भट्टने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता पूजा भट्टच्या पोस्टवर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

4/6

मुंबई मेट्रोत गाणी गाणाऱ्या ग्रुपने मेट्रोचा एक डब्बा आधीपासूनच बूक केा होता, कोणालाही त्यांच्या आवाजाचा त्रास झाला नाही, असं एका युजरने म्हटलंय. त्यामुळे या व्हिडिओवर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, असंही युजर्सने तिला सुनावलं आहे.   

5/6

या कमेंटवर पूजा भट्टने उत्तर दिलं आहे. सार्वजनिक जागेवर अशा गोष्टी कशा काय होऊ शकतात? हिंदुत्व पॉप असो, ख्रिसमसची गाणी असो की बॉलिवूडची गाणी असोत किंवा इतर काहीही असो हा सार्वजनिक जागेचा गैरवापर आहे. अधिकारी अशा गोष्टींनी कशी काय मंजूरी देतात? आपण नियमांचं पालन केलं नाही तर कायदा-सुव्यवस्था राखणं कठिण होईल' असं पूजा भट्टने म्हटलं आहे. 

6/6

पूजाने आपल्या पोस्टमध्ये राजकीय पक्षांनाही फटकारलं आहे. 'सर्व राजकीय पक्षांचे अवैध होर्डिंग शहराचं विद्रुपीकरण करतात. आता मेट्रोला पक्षाचं क्षेत्र बनवण्यात आलं आहे, असं पूजा भट्टने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. पूजा भट्ट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म  'बिग गर्ल्स डोंट क्राई' मध्ये दिसणार आहे.