35,000 महिलांशी लैंगिक संबंध ठेवणारा राष्ट्रपती! तुम्हाला माहितीये का?
'या' राष्ट्रपतींनी 35,000 महिलांसोबत ठेवले physical relations, कोण आहेत 'हे' महाशय?
Former Cuban President Fidel Castro : जगात अनेक राष्ट्राध्यक्ष त्यांनी केलेल्या कामगीरीसाठी ओळखले जातात पण असे काही राष्ट्राध्यक्ष देखील आहेत जे त्यांच्या वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आले आहेत. या व्यक्तीने त्यांचा 35,000 महिलांशी संबंध असल्याचा दावा केला होता. याशिवाय त्याला 600 हून अधिक वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रत्येक वेळी तो फरार झाला. शत्रू त्यांना इजा करू शकले नाहीत. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष (Cuban President) फिडेल कॅस्ट्रो (fidel castro) होते. फिडेल कॅस्ट्रो नेहमी आपल्या शत्रूंच्या विचारात दोन पावले पुढे होते. एकदा एक स्त्री फिडेल कॅस्ट्रोला मारण्यासाठी त्याची मैत्रीण देखील बनली होती, परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो (Former Cuban President Fidel Castro) यांच्या जीवनातील काही रंजक किस्से जाणून घेऊया.
![FIDEL CASTRO, CUBA, VIRAL NEWS, world news, news update, marathi trending news, trending news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/1443298-fidel-castro1.jpg)
![FIDEL CASTRO, CUBA, VIRAL NEWS, world news, news update, marathi trending news, trending news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/1443297-fidel-castro2.jpg)
![FIDEL CASTRO, CUBA, VIRAL NEWS, world news, news update, marathi trending news, trending news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/1443296-fidel-castro3.jpg)
क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी नेहमीच अमेरिकेच्या धोरणांना विरोध केला. एवढेच नाही तर त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची खिल्लीही उडवली. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी फिडेल कॅस्ट्रोला मारण्याचा बराच काळ प्रयत्न केला पण ते नेहमीच अयशस्वी ठरले. फिडेल कॅस्ट्रोवरील 600 हून अधिक हल्ले अयशस्वी झाले.
![FIDEL CASTRO, CUBA, VIRAL NEWS, world news, news update, marathi trending news, trending news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/1443295-fidel-castro4.jpg)