स्कुबा डायव्हिंगसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे; इथं जायचं कसं? खर्च किती येईल?

महाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया. 

Mar 04, 2024, 23:20 PM IST

Scuba Diving in Maharashtra : समुद्र किनाऱ्यावर फिरताना माशांप्रमाणे खोल समुद्रात पोहावे असं अनेकांना वाटतं. समुद्राच्या आतील जग किती सुंदर असेल याचे अनेकांना कुतूहल असते. स्कुबा डायव्हिंग करताना खोल समुद्रातील जगाची सफर करता येते. स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील हे ठिकाणे बेस्ट ऑप्शन आहेत. 

1/7

स्कुबा डायव्हिंगचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर थेट कोकणात ट्रीप प्लान करा. अगदी कमी खर्चात स्कुबा डायव्हिंगसारखा थरारक अनुभव घेता येईल. 

2/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग आणि दांडेश्वर हे समुद्र किनारे देखील स्कुबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहेत.

3/7

वेंगुर्ला समुद्र किनाऱ्या गोव्यापासून अगदी जवळ आहे. येथे पर्यटकांची फार गर्दी नसते. यामुळे स्कुबा डायव्हिंगचे हे ठिकाण एकदम बेस्ट ऑप्शन आहे.   

4/7

 मालवणचा समुद्र देखील अनेक वॉटर स्पोट्स एक्टीव्हीटीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथे स्कुबा डायव्हिंगचा विलक्षण अनुभव मिळतो.  

5/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्र किनारा नेहमीच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. हजारो पर्यटक येथे खास स्कुबा डायव्हिंगसाठी येतात.

6/7

रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या  समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेता येईल. रत्नागिरी हे सिंधुदुर्गच्या तुलनेत मुंबई पुण्यापासून  जवळ आहे. मात्र, येथे जाताना चौकशी करुन जावे.  

7/7

अंथांग सागरी किनारा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात स्कुबा डायव्हिंग अनुभव घेता येवू शकतो. मुंबई, पुण्यापासून आठ ते नऊ तासांत कोकणात जाता येते.