'शिक्षक कोमात आहे'; भूगोलाच्या पेपरातलं 'ते' उत्तर वाचून शिक्षकांचा शेरा; असं काय लिहिलं एकदा वाचाच

Exam Answer Sheet Goes Viral: परीक्षेत पेपर लिहिणे ही एक कला आहे असं सहजपणे म्हटलं जातं. किती आणि काय लिहिल्यावर किती गुण मिळणार हे ज्याला समजलं तो सहज उत्तीर्ण होऊ शकतो असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा सोशल मीडियावर भन्नाट उत्तरपत्रिकांचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होतोय...

| Jan 15, 2024, 15:20 PM IST
1/8

Exam Answer Sheet Goes Viral

सध्या सोशल मीडियावर अशाच एका उत्तरपत्रिकेचा फोटो व्हायरल झाला आहे. या उत्तर पत्रिकेतील उत्तर पाहून शिक्षकांनाच मोठा धक्का बसला आहे. हा पेपर पाहून शिक्षिकेने दिलेला शेरा चर्चेचा विषय ठरतोय.

2/8

Exam Answer Sheet Goes Viral

शिक्षिकेनं यावर दिलेला शेरा वाचून तुम्हाला रडावं की हसावं हे कळणार नाही. मात्र हे उत्तर सविस्तरपणे वाचलं तर तुम्हाला या मुलाच्या विचाराची रेल्वे गाडी कुठून कुठे गेली आहे याचा विचार करुन थक्क व्हायला होईल.

3/8

Exam Answer Sheet Goes Viral

आजच्या स्मार्ट फोनच्या जगातील पिढी ही फारच स्मार्ट आहे. या पिढीला काहीही सांगावं लागत नाही असं म्हटलं जातं. मोबाईल वापरापासून ते युट्यूबमुळे जगभरातील ज्ञान हाताच्या बोटांवर असलेली ही पिढी फारच हुशार झाली असून त्यांची हुशारी अभ्यासातही दिसून येत आहे. ही मुलं त्याच्या गप्पांमध्ये कोणालाही सहज गुंडाळू शकतात.

4/8

Exam Answer Sheet Goes Viral

परीक्षेत भुगोलाच्या पेपरमध्ये उत्तर देताना एका अशाच स्मार्ट पोराने शिक्षिकेला गुंडाळण्याचा प्रयत्न केला. सामान्यपणे दिर्घोत्तरांमध्ये मधल्या पॅरांमध्ये काहीही लिहिलं तरी विशेष फरक पडत नाही असा एक समज आहे. किती लांबींचं उत्तर लिहिलं आहे यावर मार्क देतात असं म्हटलं जातं.

5/8

Exam Answer Sheet Goes Viral

याच लांब उत्तराच्याआधारे वेळ मारुन नेण्याचा एका विद्यार्थ्याचा प्रयत्न फारच फसला आणि त्याला मार्क तर मिळाले नाहीच पण शिक्षकांनी फार अजब शेराही त्याला दिला. 

6/8

Exam Answer Sheet Goes Viral

खरंतर या उत्तरपत्रिकेनं सर्वांचीच झोप उडवून टाकली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या विद्यार्थ्याने जे काही लिहिलंय ते पाहून शिक्षिकेने त्याला भोपळा म्हणजेच शून्य मार्क दिले आहेत. मात्र इतक्यावरच न थांबता शिक्षेकेने 'शिक्षक कोमात आहे' असा शेरा ही दिला आहे.

7/8

Exam Answer Sheet Goes Viral

तुम्ही सुद्धा या मुलाने लिहिलेलं उत्तर वाचून कोमात वगैरे जाऊ शकता. कारण या उत्तरामध्ये त्याने लिहिलेल्या ओळी या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाताना दिसत आहे. हे उत्तर हे एका ठिकाणाहून सुरू होते ते कुठच्या कुठे पोहचते. सतलज नदीवर बांधलेल्या धरणापासून हे धरणं कुठे आहे ते राज्य कोणतं आणि मग त्यानंतर हा विद्यार्थी अगदी सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाची शेती, टाटा-बाय बाय, साखर, लंडन, जर्मनीचा महायुद्धातील समावेशापर्यंत पोहचतो आणि मग परत तो सतलज धरणाच्या मुद्द्याकडे येतो. त्याची ही जबरदस्त शैली पाहून शिक्षक तर कोमातच जातात. त्याला चक्क 10 पैंकी 0 मार्क्स देतात आणि लिहितात की टीचर कोमात आहे.

8/8

Exam Answer Sheet Goes Viral

तुम्हीच पाहा ही व्हायरल झालेली उत्तर पत्रिका...