'या' स्टार क्रिकेटर्सच्या मुलांनी क्रिकेट सोडून धरली ग्लॅमरची वाट, तिसरं नाव आश्चर्याचा धक्का देणारं
Cricketer Kids : ग्लॅमरच्या दुनियेचं (Bollywood) आकर्षण केवळ तरुणवर्गाला मोठ्या प्रमाणावर असतं. देशातील अनेक मुलं दररोज मायानगरी मुंबईत (Mumbai) बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न घेऊन येत असतात. प्रत्येकाला आपण कलाकार बनावं असं वाटत असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. सामान्य माणसाप्रमाणेच इतर क्षेत्रातील दिग्गजांची मुलंही ग्लॅमरच्या या दुनियेत स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत असतात. यात भारतातल्या काही दिग्गज क्रिकेटर्सच्या (Indian Cricketers) मुलांचाही समावेश आहे. वडिलांप्रमाणे क्रिकेटर न होता या मुलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1/5
मंसूर अली खान - सैफ अली खान
माजी क्रिकेटर मंसूर अली खान पटौदी यांचं भारतीय क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे. पण त्यांची मुलं सैफ अली खान आणि सोहा अली खान यांनी क्रिकेटर्स न होता फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलं. सोहा अली खानने लग्न झाल्यानंतर बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. तर सैफ अली खान आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. सैफने अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत.
2/5
विवियन रिचर्ड्स-मसाबा गुप्ता
वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर विवियन रिचर्डस यांचं नाव आजही क्रिकेट जगतात आदराने घेतलं जातं. विवियन रिचर्डस यांची मुलगी मसाबा गुप्ताने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून केली. याानंतर तीने 2020 मध्ये मसाबा मसाबा या OTT प्लॅटफॉर्मवरच्या मालिकेतून अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकलं. मसाबाची आई नीना गुप्ताही बॉलिवूडमधलं मोठं नाव आहे.
3/5
कपिल देव-अमिया देव
1983 च्या विश्व चषक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे भारताचे महान कर्णधार कपिल देव यांच्यावर बायोपिक बनवण्यात आला. या चित्रपटाचं नाव होतं '83'. रणवीर सिंगने या चित्रपटात कपील देव यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची असिस्टंट डिरेक्टर आहे कपिल देव यांची मुलगी अमिया देव. बॉलिवूडमध्येच तिला कारकिर्द करायची आहे.
4/5