'The Sabarmati Report साठी मी पंतप्रधानांची परवानगी घेतली नाही...'; एकता कपूरचा खुलासा
लवकरच बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे चित्रपट प्रदर्शनाच्या एक आठवड्या आधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
Diksha Patil
| Nov 07, 2024, 17:42 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/07/811537-ektakapoorsaysshedoesnottookpermissionfrompmmodi1.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/07/811536-ektakapoorsaysshedoesnottookpermissionfrompmmodi8.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/07/811535-ektakapoorsaysshedoesnottookpermissionfrompmmodi3.jpg)
त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की चित्रपट बनवताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? कारण ही घटना जेव्हा झाली त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. या प्रश्नाचं उत्तर देत एकता कपूर म्हणाली, 'या विषयावर चित्रपट करताना ना तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरकारकडून याविषयी समर्थ मागितले. मी कोणत्याही विचारसरणीला पाठिंबा देत नाही. इथे फक्त सत्य आहे आणि ही सत्यानं घेतलेली भरारी आहे.'
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/07/811534-ektakapoorsaysshedoesnottookpermissionfrompmmodi4.jpg)
एकता कपूरनं धर्मनिरपेक्ष या मुद्द्यावर वक्तव्य केलं. जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की हा चित्रपट कोणत्या धर्मावर बनवण्यात आला आहे का किंवा यात कोणत्या धर्माला पाठिंबा दिला आहे का? तर त्याचं उत्तर देत एकता म्हणाली, मी एक हिंदू आहे, ज्याचा अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे? मी कधीच कोणत्या धर्मावर कमेंट करणार नाही कारण मी हिंदू आहे आणि मी एक सांगू इच्छिते की माझं सगळ्या धर्मांवर तितकंच प्रेम आणि आदर आहे.
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/07/811533-ektakapoorsaysshedoesnottookpermissionfrompmmodi5.jpg)