हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...

Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा. 

Nov 26, 2023, 15:07 PM IST
1/10

हस्तमैथुन हा पुरुषांची अगदी खाजगी गोष्ट असते पण त्याबद्दल अनेक गोष्टी त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. पुरुषांच्या वीर्यातून जे निघते त्याला स्पर्म, लिक्विड किंवा प्रोस्टाग्लॅंडिन असं म्हटलं जातं.   

2/10

तज्ज्ञ सांगतात की, हस्त मैथुन ही नैसर्गिक गोष्ट असून ते त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यास मदत होते. 

3/10

हस्तमैथूनबद्दल अनेकांच्या मनात चुकीची मान्यता देखील आहे. हस्तमैथून हे आरोग्यासाठी चांगल असल्याचं तज्ञ्जांचं मत आहे. पण त्याचा अतिरेक टाळला पाहिजे.   

4/10

पण हस्तमैथुनचा अतिरेक केल्यामुळे खरंच शरीरातील शुक्राणूंच्या संख्येत घट होते का? त्याशिवाय तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का?  

5/10

तज्ज्ञ सांगतात की, संभोग दरम्यान पुरुषाचे जे वीर्य येतं त्यात सामान्यपेक्षा कमी शुक्राणू असतात. डॉक्टरी भाषेत याला ऑलिगोस्पर्मिया असं म्हणतात.   

6/10

डॉक्टर सांगतात की, जेव्हा एखाद्या पुरुषमध्ये सामान्यापेक्षा कमी शुक्राणूंची संख्या असेल तर त्याला अंड पेनिट्रेटची समस्या आहे. म्हणजे त्या पुरुषाला वंध्यत्नवची समस्या असते.   

7/10

पुरुषांच्या अंडकोषात पौगंडावस्थेनंतर वीर्य तयार होत असतं. पुरुषांच्या अंडकोषात सतत वीर्य असतो. ते मोकळं करण्यासाठी पुरुष हस्तमैथुन करतात.   

8/10

मग हस्तमैथून केल्याने शुक्राणूंची संख्या खरंच कमी होते. तर डॉक्टरच म्हणतात की, हस्तमैथून केल्यामुळे वीर्य कमी होत नाहीत. 

9/10

डॉक्टर म्हणतात की, पुरुषांच्या अंडाकोषात सतत वीर्य तयार होत असतो. तो त्यांना बाहेर काढणंही गरजेचं असतं. त्या पुरुषाच्या शरीर क्षमतेनुसार वीर्य तयार होत असतं.   

10/10

जर एखाद्या पुरुषाने वर्षभर शारीरिक संबंध ठेवले नसतील तर त्याला डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. तरदुसरी बाजू वर्षभर शारीरिक संबंध ठेवूनही गूड न्यूज मिळतं नसेल तरीही डॉक्टरांना संपर्क करणे गरजेचं आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)