मासिक पाळीच्या दिवसांत कंबर, पाठदुखीचा त्रास असह्य होतो, करा 'ही' 4 योगासने
मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना क्रॅम्प्स, ब्लॉटिंग, मूड स्विंग्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
Mansi kshirsagar
| May 31, 2023, 20:14 PM IST
Yoga For Menstrual Cramps: मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना क्रॅम्प्स, ब्लॉटिंग, मूड स्विंग्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
1/5
मासिक पाळीच्या दिवसांत कंबर, पाठदुखीचा त्रास असह्य होतो, करा 'ही' 4 योगासने

2/5
जानुशीर्षासन

मासिक पाळीच्या काळात जानुशीर्षासन हे आसन केल्यास फायदा होऊ शकतो. हे आसन करताना योगा मॅटवर पाठ ताठ ठेवून सुखासनमध्ये बसा. त्यानंतर दोन्ही पाय लांब करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवावा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या जांघेवर ठेवावी. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवून ठेवा. आता हळूवार शरीराच्या वरच्या भागाला वाकवून डोकं गुडघ्याला लावावं. हातांने पायाचा अंगठा पकडावा. काही वेळ या स्थितीत राहावं. थोडी- थोडी विश्रांती घेत पाच वेळा हे आसन करावं.
3/5
धनुरासन

धनुरासनमुळं पाठीचा कण लवचिक होण्यास मदत मिळते. हे आसम करताना पोटावर झोपावे व कपाळ जमिनीवर ठेवावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा त्यानंत पाय गुडघ्यात दुमडा. डोके वर उचलून हनुवटी जमिनीवर ठेवावी. उजव्या आणि डाव्या हातांनी पायाचे घोटे धरावे. हे आसन करताना हात कोपऱ्यात वाकवू नये. यामध्ये शरिराचा सर्व भार पोटावर येतो. पाच वेळा हे आसन करा.
4/5
उष्ट्रासन

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी वज्रासनमध्ये बसावं. त्यानंतर गुडघे जमिनीवर टेकवावे. तुमचे खांदे आणि गुडघे एका रेषेत असूद्यात. त्यानंतर तुमचे शरीर मागे वाकवा व पायाच्या टाचा धरण्याचा प्रयत्न तरा. नितंब पुढे ढकलून डोके मागे करा. २५ सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू पुन्हा मूळ स्थितीत या. पाच वेळा हे आसन करावे.
5/5
बलासन
