न्यूझीलंडने टी20 ट्रॉफी जिंकली आणि 'ही' खेळाडू बनली इंटरनॅशनल क्रश... सौंदर्य पाहून चाहते घायाळ

Amelia Kerr Photos : महिला टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये न्यूझीलंडने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकचा पराभव करत पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची किमया केली. या विजयामुळे न्यूझीलंड संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच न्यूझीलंड संघातील एक खेळाडू्च्या सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलंय  

| Oct 21, 2024, 15:28 PM IST
1/7

महिला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत न्यूझीलंडने पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची किमया केली आहे. टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं न्यूझीलंडने 158 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेला 126 धावाच करता आल्या.

2/7

या विजयामुळे न्यूझीलंड संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच न्यूझीलंड संघातील एक खेळाडू्च्या सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. न्यूझीलंडची स्टार ऑलराऊंडर एमिलिया केरने संपूर्ण टी20 वर्ल्ड कपदरम्यान दमदार कामगिरी केली.   

3/7

एमिलिया केरच्या या दमदार कामगिरीमुळेच ती प्लेअर ऑफ द टूर्नामेंटची मानकरी ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातही एमिलायने 38 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानंतर चार षटकात 24 धावा देत 3 विकेटही घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर तिला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही देण्यात आला.  

4/7

24 वर्षांच्या एलिमियाने संपूर्ण स्पर्धेत तुफान कामगिरी करत आपली छाप उमटवली. पण त्याचबरोबर तिच्या सौंदर्यानेही चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या खेळाबरोबरच सगळीकडे तिच्या सौंदयर्याची चर्चा रंगली आहे. 

5/7

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एमिलिया केरचे 76 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या क्रिकेटमधली कामगिरीचे अनेक फोटो ती आपल्या अकाऊंवरुन शेअर करत असते. एखाद्या मॉडेल सारखं सौंदर्य असल्याच्या प्रतिक्रिया चाहते तिच्या फोटवर देत असतात.

6/7

एमिलिया केरचं संपूर्ण कुटुंब क्रिकेटशी संबंधीत आहे. एमिलियाचे आजोबा ब्रूस मरे यांनी न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर बहिण जेस केरन आंतराष्ट्रीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे क्रिकेट एमिलियाच्या रक्तातच आहे. 

7/7

एमिलिया केरने न्यूझीलंडसाठी आतापर्यंत 74 एकदिवसीय सामन्यात 2082 धावा केल्या आहेत. तर एकिदिवसीय सामन्यात तिच्या नावावर 91 विकेटही जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद 232 हा तिचा सर्वोत्तम स्कोर आहे. तर 85 टी20 सामन्यात तीने 1296 धाावा आणि 93 विकेट घेण्याची कामगिरी केलीय.