'मी रोज पहाटे 3.30 ला उठतो, दर सोमवारी उपवास करतो आणि...'; चंद्रचूड यांच्या फिटनेसचं रहस्य
CJI DY Chandrachud Food Habits Health Tips: धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणजेच डी. व्हाय. चंद्रचूड हे नाव न ऐकलेला भारतीय सापडणं तसं कठीणच आहे. देशातील सर्वोच्च न्यायासंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे मागील काही काळापासून वेगवेगळ्या प्रकरणांमधील न्यायदानामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र एवढ्या सर्वोच्च पदावर न्यायदान करताना स्वत:च्या आरोग्याकडे ते कसं लक्ष देतात यासंदर्भात नुकताच त्यांनी खुलासा केला. यामध्ये अगदी दिनक्रम कसा सुरु होतो इथपासूनची माहिती त्यांनी दिली. जाऊन घेऊयात याचसंदर्भात...
Swapnil Ghangale
| Mar 21, 2024, 13:02 PM IST
1/9

2/9

3/9

4/9

"माझा दिवस साडेतीन वाजता सुरु होतो. त्यावेळेस वातावरण शांत असतं. तेव्हा मला चिंतन करता येतं. मी मागील 25 वर्षांपासून योग अभ्यास करत आहे. माझी पत्नी माझी फार चांगली मैत्रीण आहे. आम्ही दोघेही व्हेगन असल्याने आम्ही आयुर्वेदिक आहारपद्धतीचं जेवण करतो. आमची लाइफस्टाइलही वनस्पतीजन्य पदार्थांवर अवलंबून आहे," असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
5/9

आपण जे काही खातो त्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो, असं माझं मत आहे असेही चंद्रचूड यांनी सांगितलं. फिटनेस ही तुम्हाला स्वत:ला जाणवली पाहिजे. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये, मेंदूत आणि अगदी हृदयापासून फिटनेस जाणवली पाहिजे. असा विचार केला तर तुम्ही जेवढा विचार करणार तेवढे फिट राहणार, असं सरन्यायाधीश म्हणाले.
6/9

7/9

8/9

9/9
