पृथ्वीवरचं सर्वात मोठं ओझ! यामुळेच जीवसृष्टीचा विनाश होणार
Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
China Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठं धरण चीन मध्ये आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले. 2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे. ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली. हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते.




हे धरण 2.3 किलोमीटर लांब, 115 मीटर रुंद आणि 185 मीटर उंच आहे. या धरणाच्या जलाशयात 42 अब्ज टन पाणी आहे. धरण परिसरात 6,400 वनस्पती प्रजाती, 3,400 कीटक प्रजाती, 300 माशांच्या प्रजाती आणि 500 पेक्षा जास्त स्थलीय पृष्ठवंशीय प्रजाती आहेत. या बंधाऱ्यामुळे या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. या धरणामुळे दुष्काळ आणि रोगराईही वाढली आहे.

