Mahindra BE 6; एक दमदार इलेक्ट्रिक SUV; फिचर्स, किंमत सगळेच काही जाणून घ्या एका क्लिकवर

अलीकडेच महिंद्राने नवीन इलेक्ट्रिक SUV BE 6 लॉन्च केली आहे.  महिंद्रा अँड महिंद्राने 2024 च्या अखेरीस त्यांची पहिली इलेक्ट्रिक वाहने लाँच केली होती. तुम्हीदेखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या फिचर्सची नक्कीच मदत होईल.

Feb 20, 2025, 15:43 PM IST
1/6

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांना एकामागुन एक लॉन्च करत आहेत. भारतात वाजवी दरात टेस्ला इलेक्ट्रिक कार येण्याची घोषणाही झाली आहे, त्यामुळे BE 6 आणि टेस्लाच्या कारमध्ये मोठी स्पर्धा होईल असे वाटते. विशेष बाब म्हणजे ही कार भारतात बनलेली असल्यामुळे हीला खूप पसंती दिली जात आहे.  या स्वदेशी इलेक्ट्रिक कारबद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. 

2/6

महिंद्रा BE 6 मध्ये दोन मोठ्या बॅटरी उपलब्ध आहेत – 59kWh आणि 79kWh. 59kWh बॅटरी असलेला व्हेरिएंट 231 PS पॉवर आणि 380Nm टॉर्क निर्माण करतो, तर 79kWh बॅटरी असलेला व्हेरिएंट 286 PS पॉवर आणि समान 380Nm टॉर्क जनरेट करतो.  

3/6

या SUVत दोन बॅटरी पॅक आहेत. एवढेच नाही तर या कराच रेंज 682 किलोमीटर आहे. टिल्ट आणि टेलिस्कोपिक अ‍ॅडजस्टेबल स्टीअरिंग व्हीलदेखील आहेत.   

4/6

या SUVला फक्त 20 मिनिटांत चार्ज करता येते.   पुढच्या आणि मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी ६५-वॅट टाइप-सी फोन चार्जिंग पोर्ट. वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले सुद्धा उपलब्ध आहे.   

5/6

सुरक्षिततेच्या बाबतीत तर या कारच्या फिचर्सने कमालच केली आहे. या करामध्ये ड्रायव्हरची तंद्री ओळखणारे, कमी टायर प्रेशर इंडिकेटरे आणि सेन्सर्ससह मागील पार्किंग कॅमेरा फिचर आहेत.  

6/6

या SUV ची किंमत 18.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. महिंद्राने दोन नवीन इलेक्ट्रिक SUV – Mahindra BE 6 आणि XEV 9e साठी बुकिंग सुरू केले आहे.