तुमच्याही WhatsApp मध्ये हे बदल दिसतायेत? अकाऊंट हॅक तर नाही झालंय ना?

Tech News : हेच अॅप करप्ट झाल्यास मात्र गोंधळ उडतो. कारण, अशानं मोबाईलमधील डेटा धोक्यात असतो. असंच काहीसं सध्या अनेकांच्याच मोबाईलमध्ये असणाऱ्या Whats App मध्ये होऊ शकतं. 

Oct 02, 2024, 14:29 PM IST

Tech News : हातात असणारा स्मार्टफोन अनेकांचाच क्षणाक्षणाचा सोबती झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये असणारे अनेक फिचर जगणं अधिकाधिक सोपं करताना दिसतात. 

1/7

व्हॉट्सअप

changes in whatsapp signifies your account is being hacked android

हल्ली व्हॉट्सअपच्या माध्यमातून फक्त कॉलिंग आणि मेसेजिंगच नव्हे, तर या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट आणि तत्सम इतर कामंही केली जातात. 

2/7

आर्थिक व्यवहार

changes in whatsapp signifies your account is being hacked android

थोडक्यात आर्थिक व्यवहार या माध्यमातूनही होत असल्यामुळे हॅकर्सची नजर कायमच असंख्य व्हॉट्सअप अकाऊंटवर असते. त्यामुळं तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवणं ही सर्वात महत्वाची बाब. 

3/7

लक्षात घ्या

changes in whatsapp signifies your account is being hacked android

लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अशी काही नावं आणि नंबर दिसत असतील ज्यांना तुम्ही अॅड केलेलं नाही, तर याचा अर्थ तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं असून, त्याचा वापर दुसरं कोणीतरी करत आहे. 

4/7

लॉगइन

changes in whatsapp signifies your account is being hacked android

सतत प्रयत्न करूनही जर तुम्हाला अकाऊंट लॉगइन करता येत नसेल तरीही तुमचं अकाऊंट हॅक झाल्याची दाट शक्यता असते.   

5/7

वेरिफिकेशन कोड

changes in whatsapp signifies your account is being hacked android

जर तुमच्या व्हॉट्सअपवर सतत वेरिफिकेशन कोड येत असेल तर ही टू स्टेप वेरिफिकेशनची पद्धत नसून, तुमचं अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता असते. 

6/7

दुर्लक्ष

changes in whatsapp signifies your account is being hacked android

बऱ्याचदा अनावधानानं व्हॉट्सअपमध्ये होणाऱ्या बदलांकडे काही युजरचं दुर्लक्ष होतं. पण, हाच बेजबबादारपणा महागात पडू शकतो.   

7/7

सावधगिरी

changes in whatsapp signifies your account is being hacked android

गेल्या काही वर्षांमध्ये विविध तंत्रांचा वापर करत अकाऊंट हॅक केले जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं असून, त्याच धर्तीवर सावधगिरी बाळगली जाणं महत्त्वाचं असल्याचा इशारा यंत्रणा देत आहेत.