सुपरस्टारच्या प्रेमात धर्म बदलला, पण नातंच तुटलं; नंतर दिग्दर्शकासोबत थाटला संसार, आज 200 कोटींची मालकिण

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या निर्णयामुळं वाद-विवाद निर्माण झाले आहेत. किंवा कोणी प्रेमप्रकरणामुळं चर्चेत राहिले आहेत. आज अशाच एका सुपरस्टार लेडीचा वाढदिवस आहे.

Mansi kshirsagar | Nov 18, 2024, 11:43 AM IST

Nayanthara Birthday: चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या निर्णयामुळं वाद-विवाद निर्माण झाले आहेत. किंवा कोणी प्रेमप्रकरणामुळं चर्चेत राहिले आहेत. आज अशाच एका सुपरस्टार लेडीचा वाढदिवस आहे.

 

1/7

सुपरस्टारच्या प्रेमात धर्म बदलला, पण नातंच तुटलं; नंतर दिग्दर्शकासोबत थाटला संसार, आज 200 कोटींची मालकिण

 Birthday Special 40 Years Old Lady Superstar Nayanthara Changed Her Religion For Love

बॉलिवूडमधील सुपरस्टारबद्दल तुम्ही ऐकलं असेलच पण सिनेसृष्टीत लेडी सुपरस्टारदेखील आहेत. ज्यांच्याबद्दल खूप कमी जणांना माहिती असतं. या साउथच्या लेडी सुपरस्टारचा वाढदिवस आहे.   

2/7

साउथच्या या सुपरस्टार अभिनेत्रीने प्रेमासाठी धर्म बदलला पण प्रेम काही यशस्वी होऊ शकलं नाही. या अभिनेत्रीने अनेक ब्लॉकब्लास्टर सिनेमे दिले आणि आज ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकिण आहे. 

3/7

या अभिनेत्रीचा जन्म ख्रिश्चन धर्मात झाला होता. कॉलेजमध्ये पदवीपूर्ण करताना तिने पार्ट टाइम मॉडलिंगला सुरुवात केली. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात 2003मध्ये केली होती. तिला इंडस्ट्रीमध्ये 20 वर्ष पूर्ण झाली. या दरम्यान तिने 80हून अधिक सिनेमां काम केले आहे. या हिरोईनचे नाव नयनतारा आहे. मात्र खरे नाव डायना मरियम कुरियन असं आहे. आज अभिनेत्रीचा 40 वा जन्मदिवस आहे. तिचा जन्म 18 नोव्हेंबर 1984मध्ये बेंगळुरु कर्नाटकमध्ये झाला होता. 

4/7

2003मध्ये मल्याळम चित्रपट मनसिनक्करेतून करिअरची सुरुवात केली होती. आज नयनतारा साउथ फिल्म इंडस्ट्रीची लेडी सुपरस्टार आहे. तिच्या करिअरमध्ये ती जवळपास सर्वच साउथच्या सुपरस्टारसोबत काम केलं आहे. पहिल्या चित्रपटात काम करण्याआधी ती नयनतारा एका टीव्हीवर होस्ट म्हणून काम करत होती. पहिल्या चित्रपटात यश मिळवल्यानंतर तिला अनेक सिनेमे मिळत गेले. 2018मध्ये ती साउथ फिल्म इंडस्ट्रीची पहिली हिरोईन ठरली होती. ती फोर्ब्स इंडियाच्या 100 सेलिब्रिटी लिस्टमध्ये सामील झाली होती. 

5/7

नयनताराने 27 वर्षाची असताना तिचा धर्म बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागे एक खास कारण होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी 2011मध्ये धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि नाव नयनतारा ठेवलं होतं. त्यासाठी तिचे कुटुंब मात्र विरोधात होते. अभिनेता व डान्सर प्रभूदेवा यांच्या प्रेमात असताना तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटलं जातं. मात्र, त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. 

6/7

नयनताराने तिच्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले होते. यातील अनेक चित्रपट हिट आणि ब्लॉकब्लास्टर झाले. यात चंदमुखी, थानी ओरुवान, अराम, राजा राणी आणि अनेक चित्रपटांची नावे आहेत. नयनताराने शाहरुख खानचा हिट चित्रपट जवानमध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. नयनताराचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट ब्लॉकब्लास्टर ठरला होता. या चित्रपटाने 1100 कोटींची कमाई केली होती. या सिनेमासाठी तिने 11 कोटींची फी घेतली होती. 

7/7

नयनतारा जवळपास 20 वर्ष या इंडस्ट्रीत आहे. या काळात तिने अनेक सिनेमे केले मिडिया रिपोर्टनुसार तिच्याकडे एकूण 200 कोटींची संपत्ती. 2022मध्ये तिने चित्रपट निर्माता विघ्नेश शिवनसोबत लग्न केले होते. त्यांना मुलंदेखील आहेत. त्यांची नावं उयिर आणि उलग आहे.