महाराष्ट्रातील 2 शहरं भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत; पहिले नाही तर दुसरे नाव ऐकून शॉक व्हाल

Richest City In India : विविधतेनं नटलेल्या समृद्ध भारताचं सा-या जगाला अप्रूप आहे. भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक श्रीमंती जगजाहीर आहे. भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 2 शहरं  आहेत. 

वनिता कांबळे | Nov 18, 2024, 18:54 PM IST

Top Ten Richest City In India 2024 : भारताच्या श्रीमंतीचं पूर्वी जगाला आकर्षण होतं... भारताशी व्यापार करण्यासाठी पूर्वी जगभरातून व्यापारी भारतात यायचे. जगातलं संपन्न राष्ट्र अशी भारताची ओळख होती. आताही जगभरात भारताची चर्चा आहे. भारतातील याच श्रीमंत शहरांच्या यादीत आपल्या महाराष्ट्रातील दोन शहर आहेत. ही शहर कोणती आहेत जाणून घेऊया.  

1/9

 भारतातील गडगंज श्रीमंतांचा डंकाही आता जगभरात वाजू लागला आहे. जाणून घेऊया भारतातील श्रीमंत शहर कोणती.   

2/9

पुणे

महाराष्ट्रात असलेले पुणे शहराचे नाव देखील भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत आहे. GDP नुसार भारतातील 7 वे सर्वात श्रीमंत शहर आहे .  पुण्यात  टाटा मोटर्स, बजाज ऑटो, फोक्सवॅगन, मर्सिडीज-बेंझ आणि फियाट सारख्या बड्या कंपन्या आहेत. तसेच हिंजवडी सारखा मोठा IT हब आहे. याचा GDP   69 अब्ज USD इतका आहे.  

3/9

मुंबई

मुंबई हे भारतातील पहिल्या क्रमकांचे शहर आहे. मुंबई हे शहर फक्त महाराष्ट्राच नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रात असलेले मुंबई शहर हे जगप्रसिद्ध आहे. याचा GDP  310  अब्ज USD इतका आहे.  

4/9

हैदराबाद

हैदराबाद हे सहाव्या क्रमांकाचे श्रीमंक शहर आहे. येथे चारमिनार, गोलकोंडा किल्ला, हुसेन सागर तलाव आणि रामोजी फिल्म सिटी अशी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेत. याचा GDP 75  अब्ज USD इतका आहे.  

5/9

चेन्नई

चेन्नई भारतातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. याचा GDP 78.6  अब्ज USD इतका आहे.  

6/9

बेंगळुरू

बेंगळुरू भारतातील चौथ्या क्रमाकांचे श्रीमंत शहर आहे. हे "सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया" म्हणून ओळखले जाते. तसेच हे भारतातील सर्वात मोठे IT हब आहे. याचा GDP 110 अब्ज USD इतका आहे.  

7/9

कोलकाता

कोलकाता हे भारतातील तिसरे श्रीमंत शहर आहे. कोलकाता, "सिटी ऑफ जॉय" म्हणूनही ओळखले जाते. याचा GDP 150  अब्ज USD इतका आहे.    

8/9

दिल्ली

दिल्ली हे शहर भारताची राजधानी आहे. तसेच दिल्ली शहर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. याचा GDP 293.6 अब्ज USD इतका आहे.    

9/9

भारतातील श्रीमंत शहरांच्या  यादीत महाराष्ट्रातील 2 शहरं  आहेत. यातील एक शहर देशाची अर्थिक राजधानी आहे. तर, दुसरं सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.