बजाजच्या Triumph बाईकवर मोठा डिस्काउंट, एकदा बसाल तर आवडणार नाहीत साधारण बाईक्स!

आजकालच्या तरुणांमध्ये बाईक्सची खूप क्रेझ आहे. दूरवरच्या प्रवासासाठी उपयोगी येईल अशी, चांगले मायलेज देणारी, कमी किंमतीतील बाईक्स तरुण शोधत असतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ट्रायम्फनी महत्वाची अपडेट दिलीय.

Pravin Dabholkar | Jul 06, 2024, 13:42 PM IST

Bajaj Triumph Partnership Bikes: आजकालच्या तरुणांमध्ये बाईक्सची खूप क्रेझ आहे. दूरवरच्या प्रवासासाठी उपयोगी येईल अशी, चांगले मायलेज देणारी, कमी किंमतीतील बाईक्स तरुण शोधत असतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ट्रायम्फनी महत्वाची अपडेट दिलीय.

1/9

बजाजच्या Triumph बाईकवर मोठा डिस्काउंट, एकदा बसाल तर आवडणार नाहीत साधारण बाईक्स!

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

Bajaj Triumph Partnership Bikes: आजकालच्या तरुणांमध्ये बाईक्सची खूप क्रेझ आहे. दूरवरच्या प्रवासासाठी उपयोगी येईल अशी, चांगले मायलेज देणारी, कमी किंमतीतील बाईक्स तरुण शोधत असतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ट्रायम्फनी महत्वाची अपडेट दिलीय.

2/9

उत्तम बाइक्स

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

ट्रायम्फ मोटारसायकल आणि बजाज ऑटो यांनी मिळून भारतीय ग्राहकांची आवड आणि गरज ओळखून उत्तम बाइक्स लाँच केल्या आहेत. कंपनीने  जून 2023 मध्ये ट्रायम्फ स्पीड ​​400 आणि ट्रायम्फ स्क्रॅम्ब्लर 400x या मिड-रेंज मोटरसायकल बाइक्स लॉन्च केल्या. 

3/9

50 हजार युनिट्सची विक्री

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

लॉन्च झाल्यापासून एका वर्षात या बाइक्सच्या 50 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. ही बाईक जगातील जवळपास 50 देशांमध्ये विकली गेली. ज्यात भारत तसेच युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि जपानचा समावेश आहे.

4/9

बाइक्सवर मोठा डिस्काऊंट

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

एका वर्षात ट्रायम्फने  बाईक्सची धमाकेदार विक्री झाली आहे. या विक्रीचे सेलिब्रेशन करण्यासाठी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी बंपर डिस्काउंट देतेय. त्यानुसार ट्रायम्फच्या या दोन्ही बाइकवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर केवळ 31 जुलै 2024 पर्यंत वैध आहे.

5/9

बाईकची किंमत

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

ट्रायम्फ स्पीड ​​400 आणि ट्रायम्फ स्क्रॅम्ब्लर  400x या दोन्हींवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच या बाईकच्या किंमतीतही बदल झाला आहे. ट्रायम्फ स्पीड ​​400ची नवीन एक्स-शोरूम किंमत 2.24 लाख रुपये झाली आहे. 

6/9

किंमत 2.54 लाख

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

तर ट्रायम्फ स्क्रॅम्ब्लर  400xची एक्स-शोरूम किंमत 2.54 लाख रुपये झाली आहे. केवळ या महिन्यासाठीच या किंमती लागू असतील.

7/9

अनेक समान फॅक्टर्स

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

ट्रायम्फच्या या दोन्ही मोटरसायकलमध्ये अनेक समान फॅक्टर्स आहेत.. या बाइक्समध्ये 398 cc, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे,  ज्यामुळे 40 bhp पॉवर मिळते आणि 38 Nm टॉर्क जनरेट करते. असे असले तरी या दोन्ही बाइक्सची रायडिंग स्टाइल वेगळी आहे.

8/9

अपडेटेड-रेट्रो रोडस्टर डिझाइन

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

Speed ​​400 ला अपडेटेड-रेट्रो रोडस्टर डिझाइन देण्यात आले आहे. ही बाइक स्ट्रीट राइडिंगसाठी सर्वोत्तम आहे. तर Scrambler 400x मध्ये मोठी चाके आहेत. 

9/9

ऑन-रोड आणि लाइट ऑफ-रोडसाठी उत्तम

Bajaj Triumph Partnership Bikes Big Discount auto Marathi News

त्यामुळे दूरच्या प्रवासावेळी सस्पेंशन आणि ब्लॉक पॅटर्न टायरचा चांगला अनुभव मिळतो. ही बाईक ऑन-रोड आणि लाइट ऑफ-रोडसाठी उत्तम पर्याय आहे.