लहान मुलं सारखं तोंडात बोट का घालतात? चांगलं की वाईट लक्षण?

लहान मुले अनेकदा झोपेत असतानाही तोंडात बोटे घालू लागतात. जर तुमचे मूलंही दूध प्यायल्यानंतर तोंडात बोट घालून चोखत असेल तर त्याला झोप आलेली असू शकते.

Pravin Dabholkar | Jan 06, 2024, 12:42 PM IST

Baby Health Tips: लहान मुले अनेकदा झोपेत असतानाही तोंडात बोटे घालू लागतात. जर तुमचे मूलंही दूध प्यायल्यानंतर तोंडात बोट घालून चोखत असेल तर त्याला झोप आलेली असू शकते.

1/8

लहान मुलं सारखं तोंडात बोट का घालतात? चांगलं की वाईट लक्षण?

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

Baby Health Tips: तुमच्या घरी किंवा आजुबाजूला लहान मुले असतील तर त्यांना तोंडात बोटे घालताना तुम्ही हमखास पाहिले असेल. जेव्हा लहान मुले तोंडात बोटे किंवा अंगठा चोखत असतात आणि तुम्ही त्यांचा अंगठा काढलात तर ते तुमच्याकडे रागाने पाहतील किंवा मग जोरजोरात रडू लागतात. 

2/8

तोंडात बोटं का घालत राहतात?

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

मुलांसाठी बोटे चोखणे खूप सामान्य असून मुल मोठे झाल्यावर बोटे चोखण्याची सवय आपोआप सोडून देतील असे पालकांनाही वाटते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लहान मुलं पुन्हा पुन्हा तोंडात बोटं का घालत राहतात? 

3/8

कारण आणि उपचार

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

लहान मुलांनी वारंवार तोंडात बोटे घालून त्यांना चोखणे खूप सामान्य आहे. यामागचे कारण आणि उपचार जाणून घेऊया. 

4/8

दात येणे

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

लहान मुले दात येत असताना तोंडात बोटे घालतात.लहान मुलांचे दात बाहेर येतात तेव्हा ते हिरड्या खाजतात. अशावेळी तोंडात बोट घातल्याने त्यांना आराम वाटतो. यामुळेच 5 ते 6 महिन्यांची मुले तोंडात बोटे घालताना तुम्ही पाहिले असेल.

5/8

झोप आल्यावर

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

लहान मुले अनेकदा झोपेत असतानाही तोंडात बोटे घालू लागतात. जर तुमचे मूलंही दूध प्यायल्यानंतर तोंडात बोट घालून चोखत असेल तर त्याला झोप आलेली असू शकते. 

6/8

भूक लागल्यावर

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

2 महिने ते 1 वर्ष वयोगटातील मुले भूक लागल्यावर तोंडात बोटे घालतात. जर तुमचे मूलं 1 ते 2 तास खेळल्यानंतर वारंवार तोंडात बोट घालत असेल तर बाळाला भूक लागलेली असू शकेल. अशावेळी बाळाला लगेच दूध पाजण्याचा प्रयत्न करा.

7/8

घाबरलेल्या स्थितीत

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

अनेक वेळा मुलांना वातावरणात बदल झाल्यावर, अनोळखी व्यक्ती भेटल्यावर किंवा रस्त्याने चालताना तोंडात बोटे घालण्याची सवय असते. मुलं मनातू घाबरलेली असताना असं करु शकतात. या परिस्थितीत मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या सभोवतालच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा. त्याच्या सभोवताली हलके संगीत वाजवा, जेणेकरून त्याला चांगले वाटेल.

8/8

आनंद व्यक्त करण्यासाठी

Baby Health Tips Why do small children put their fingers in their mouths Good or bad sign

लहान मुलांना बोलता येत नाही म्हणून ते तोंडात बोटे घालून आपला आनंद व्यक्त करतात. जर तुमचे मूल एखाद्याला पाहून हसत असेल आणि नंतर तोंडात बोट घालत असेल तर समजून घ्या की हा त्याचा आनंद व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.