Pakistan Cricket : ज्याची भीती तेच झालं, बाबर आझमला आयसीसीकडून मोठा झटका

Babar Azam In ICC Test Ranking : बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून 2-0 ने पराभव केल्यानंतर माजी कॅप्टन आणि स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. 

Saurabh Talekar | Sep 04, 2024, 19:36 PM IST
1/5

बाबर आझम

गेल्या काही दिवसांपासून बाबर आझम फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असते. भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपनंतर बाबर टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.

2/5

बाबर आझम

बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम याला साधं अर्धशतक देखील साजरं करता आलं नाही. 0, 22, 31 आणि 11 अशी धावसंख्या बाबरची राहिली. 

3/5

टेस्ट रँकिंगमध्ये घसरण

बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सिरीजनंतर बाबर आझमला टेस्ट रँकिंगमध्ये तीन अंकांची घसरण झाली असून बाबर आझम 12 व्या स्थानी ढकलला गेलाय.

4/5

आयसीसीकडून झटका

बाबर आझम गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप 10 यादीमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याला आता आयसीसीकडून मोठा झटका बसलाय.

5/5

भारतीय खेळाडू

दरम्यान, आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप 10 मध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांचा अनुक्रमे 6,7 आणि 8 असा नंबर आहे.