प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात आहे, पण फ्रीजला मराठीत काय म्हणतात माहित नाही?

General Knowledge : आपली मातृभाषा मराठी आहे. पण आपल्या बोली भाषेत असे अनेक शब्द आहेत जे सर्रास इंग्रजीत उच्चारले जातात. विशेष म्हणजे यापैकी अनेक इंग्रजी शब्दांचे आपल्याला मराठी अर्थच माहित नसतात. 

राजीव कासले | Sep 04, 2024, 19:08 PM IST
1/7

प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात आहे, पण फ्रीजला मराठीत काय म्हणतात माहित नाही?

2/7

आपल्या दैनंदिन जीवनात एकमेकांशी मातृभाषेत संवाद साधताना असे अनेक शब्द आहेत जे सर्रास इंग्रजीत उच्चारले जातात. असे अनेक इंग्रजी शब्द आहेत ज्यांना मराठीत काय म्हणतात हेच आपल्याला माहित नसतं.

3/7

असाच एक दररोजच्या वापरातला शब्द म्हणजे फ्रीज. प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात आढळणारा आणि रोजच्या वापरातल्या फ्रीजला मराठीत काय म्हणतात. अनेकांना याबद्दल माहित नाही.  

4/7

फ्रीज किंवा रेफ्रिजरेटरचा वापर अन्नपदार्थ दीर्घकाळासाठी थंड आणि ताजे ठेवण्यासाठी केला जातो. रेफ्रिजरेटर अनेक प्रकारचे असतात.  मोठमोठ्या कारखान्यापासून ते हॉस्पिटल्स, दुकाने आणि घरगुती वापरासाठी उपयोग होतो.

5/7

खाद्यपदार्थ खूप वेळ ताजे राहावे यासाठी फ्रीजचं तापमान शून्य ते चार डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवलं जातं. सामान्य फ्रीज हे ‘मेकॅनिकल कम्प्रेशन सिस्टीम’ वर काम करतं

6/7

फ्रीजला मराठीत काय म्हणतात हे 99 टक्के लोकाना माहित नाही. फ्रीजला मराठीत शीतकपाट असं म्हटलं जातं. किंवा अन्न थंड तापमानात ठेवणारे विजेवर चालणारे स्वयंपाकघरातील एक उपकरण असं म्हटलं जातं.

7/7

फ्रीजचं तापमान कमी  ठेवल्याने आतील पदार्थ अधिक सुरक्षित राहतील असं कित्येकांना वाटतं. मात्र, हा  गैरसमज आहे. कूलिंगचा स्पीड अधिक ठेवल्यास आत ठेवलेल्या अन्नावर बर्फाचा थर जमा होऊ शकतो, ज्यामुळे ते अन्न खराब होऊ शकतं