Border 2: सनी देओलमुळे आयुष्मानने 'बॉर्डर 2' सोडला? समोर आलं मोठं कारण?

सनी देओलने काही दिवसांपूर्वी 'बॉर्डर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती.  'बॉर्डर 2' मध्ये सनी देओलसोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता आयुष्मानने  'बॉर्डर 2' सोडला असल्याची माहिती समोर आली आहे. 

Soneshwar Patil | Aug 07, 2024, 14:21 PM IST
1/6

'बॉर्डर'च्या सिक्वेलची घोषण

अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वी 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. या चित्रपटात सनीसोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. 

2/6

'बॉर्डर 2'

मात्र, अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर आयुष्मानने 'बॉर्डर 2' सोडला आहे. कारण तो सनीच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल संभ्रमात होता. 

3/6

सैनिकाची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात आयुष्मान सैनिकाची भूमिका साकारण्यासाठी चर्चा करत होता. आयुष्मान आणि निर्माता दोघेही एकत्र काम करण्यास उत्सुक होते. मात्र, सनी देओलच्या भूमिकेबद्दल अभिनेता निश्चित नव्हता. 

4/6

दिलजीत दोसांझ

त्याचबरोबर या चित्रपटात पंजाबी अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. निर्मात्यांनी देखील दिलजीतशी संपर्क साधला आहे. 

5/6

'बॉर्डर'ला 27 वर्षे पूर्ण

'बॉर्डर'ने जून 2024 मध्ये 27 वर्षे पूर्ण केली. त्यानंतर सनी देओलने 'बॉर्डर'च्या सिक्वेलची घोषणा करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिलं. सनीने इन्स्टाग्रामवर त्याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

6/6

भारत-पाकिस्तान युद्ध

'बॉर्डर' हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची कथा आहे. चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या.