वाहन क्षेत्रात क्रांती! ना ब्रेक, ना गिअर, ना चालक, टेस्लाच्या नव्या कारची पहिली झलक... फिचर्स पाहून 'याड' लागेल

Tesla Cyber Taxi : वाहन क्षेत्रात नवी क्रांती घडली आहे. एलन मस्क यांनी पहिली ड्रायव्हरलेस टॅक्सी बाजारात लाँच केली आहे. 2027 पर्यंत ही कार बाजारात येणार असून रोबोवन सह या कारमध्ये 20 लोकं बसू शकतात.

| Oct 11, 2024, 19:39 PM IST
1/7

वाहन क्षेत्रात क्रांती! ना ब्रेक, ना गिअर, ना चालक, टेस्लाच्या नव्या कारची पहिली झलक... फिचर्स पाहून 'याड' लागेल

2/7

वाहन क्षेत्रात नवी क्रांती घडली आहे. एलन मस्क यांनी पहिली ड्रायव्हरलेस टॅक्सी बाजारात लाँच केली आहे. 2027 पर्यंत ही कार बाजारात येणार असून रोबोवन सह या कारमध्ये 20 लोकं बसू शकतात.

3/7

मोठ्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांनी Tesla Cybercab ची पहिली झलक दाखवली आहे. ही एक रोबोटॅक्सी (Robotaxi) आहे. ज्यात चालक नसणार आहे. प्रवाशांनी त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम रोबोट करणार आहे.   

4/7

रोबोटॅक्सीचे फिचर्स हैराण करणारे आहेत. या टॅक्सीत ड्रायव्हर तर नाहीच शिवाय स्टिअरिंगही नसणार आहे. इतकंच नाही तर कारमधअेय क्लच, ब्रेक आणि गिअरही नाहीत. ही पूर्ण यांत्रिक कार असणार आहे. 

5/7

एका भव्या कार्यक्रमात एलन मस्क यांनी रोबोटॅक्सीची झलक दाखवत कारबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. या सोहळ्याची लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आली त्यामुळे जगभरातील लोकांना या कारची झलक पाहाता आली. 

6/7

रोबोटॅक्सी ही पूर्णपणे स्वंयचलित कार आहे, यात प्रवाशांना केवळ जाऊन बसायचं आहे. कुठे जायचं आहे याची यांत्रिक नोंद केल्यानंतर ही टॅक्सी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवेल. ही टॅक्सी खूप सुरक्षित असल्याचं मस्क यांनी सांगितलंय. ही टॅक्सी बाजारात आल्यानंतर भविष्यात प्रवासी वाहतूकीत मोठी क्रांती होईल.   

7/7

सुरक्षिततेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ही ड्रायव्हरलेस टॅक्सी सामान्य टॅक्सीच्या तुलनेत 10 ते 20 टक्के अधिक सुरक्षित आहे. शिवाय या टॅक्सीचा खर्चही कमी असणार आहे. प्रती किमी 0.20 डॉलर इतका खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे.