प्रधान सचिवपदी नियुक्तीनंतर अश्विनी भिडेंकडे काय असणार जबाबदारी? किती मिळणार पगार?

मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

| Dec 13, 2024, 16:56 PM IST

IAS Ashwini Bhide: मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

1/8

प्रधान सचिवपदी नियुक्तीनंतर अश्विनी भिडेंकडे काय असणार जबाबदारी? किती मिळणार पगार?

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

IAS Ashwini Bhide: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

2/8

कोण आहेत अश्विनी भिडे?

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली होती. आता हा पदभार अश्विनी भिडे संभाळणार आहेत. कोण आहेत अश्विनी भिडे? त्यांच्याकडे काय असणार जबाबदारी? त्यांना किती मिळेल पगार? सविस्तर जाणून घेऊया.

3/8

मेट्रो वुमन

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

अश्विनी भिडे या एक आयएएस अधिकारी आहेत. छोट्याश्या गावातून येऊन या पदापर्यंत पोहोचल्याने त्या लाखो तरुणांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. त्या मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जातात. मुंबईभर मेट्रोचं जाळ विणण्यात, राज्याला औद्योगिकरणाच्या बाबतीत प्रगतीपथावर नेण्यात अश्विनी भिडे यांचा महत्वाचा वाटा आहे.

4/8

1995 मध्येयूपीएससी उत्तीर्ण

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

अश्विनी भिडे यांनी स्थानिक ग्रामीण  शाळेतून आपले शिक्षण पूर्ण केले.  त्यामुळे आयएएस काय असते? याबद्दल माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. असे असताना दोन-तीन प्रयत्नानंतर 1995 मध्ये त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यावेळी महिला उमेदवारांमध्ये टॉपर ठरल्या होत्या.

5/8

कारशेडच्या मुद्द्यावरून मतभेद

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

डिसेंबर 2019 मध्ये शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरून मतभेद झाले होते. महाविकास आघाडी सरकारने जानेवारी 2020 मध्ये त्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

6/8

कोरोना काळात महत्वाची जबाबदारी

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांच्याकडे कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली. दोन महिन्यांनी म्हणजेच मे 2020 मध्ये भिडे यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

7/8

जबाबदारी

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

प्रधान सचिव हे राज्य सरकार आणि भारताच्या केंद्र सरकारमधील एक पद आहे. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा वरिष्ठ नागरी सेवक असतो. प्रधान सचिव हा सर्वसाधारणपणे राज्य सरकारमधील विभागांचा प्रशासनिक प्रमुख असतो.

8/8

पगार

Ashwini Bhide appointed as Maharashtra Principal Secretary Salary Responsibility Marathi News

सध्याच्या वेतनश्रीनुसार महाराष्ट्र प्रधान सचिवाला 1 लाख 60 हजार रुपये ते 1 लाख 70 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. यासोबतच त्यांना सरकारकडून काही सुविधादेखील दिल्या जातात.