Overthinking मुळे होतोय त्रास? फॉलो करा 'या' 5 टिप्स; Negativity होईल दूर

Overthinking : प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं असतं की ते कधी ना कधी असा काही निर्णय घेतात की त्यावर नंतर ते आणखी बराचवेळ विचार करत राहतात. तर काही लोक आहेत जे रात्र-दिवस एकाच विषयावर खूप विचार करत राहतात. कोणत्याही विषयावर विचार गरज नसताना जास्त विचार करत राहणं हे आरोग्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे. जर तुम्ही देखील अशाच प्रकारे गरज नसताना खूप विचार करत असाल तर इथे सांगितलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो करा.

| Nov 02, 2024, 16:15 PM IST
1/7

कोणत्याही गोष्टीला घेऊन जर तुम्ही दिवस-रात्र विचार करत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काही चांगला परिणाम होणार नाही आहे. याचा सर्वसाधारण अर्थ हा कोणत्याही विषयावर जास्त विचार करणं हे चांगलं नाही. त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊया...

2/7

ध्यान (मेडिटेशन) करा

मेडिटेशन अर्थात ध्यान करा त्यामुळे तुमचं मन हे शांत राहिल. कमीत कमी 10 मिनिटं ध्यान करा. जर तुम्ही दररोज हे केलं तर त्यानं ओवरथिंकिंग म्हणजेच जास्त विचार करणं हळू-हळू कमी होईल. 

3/7

स्वत: ला दुसऱ्या कामांमध्ये गुंतवा

सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे तुमच्या मेंदूला दुसऱ्या कामांमध्ये गुंतवून ठेवा जेणे करून तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर विचार करण्यासाठी थोडाही मोकळा वेळ मिळणार नाही. 

4/7

काय करू शकता?

मन व्यस्त ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी करू शकता असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचा, चित्र काढा, गाणी ऐका किंवा तुम्हाला आवडणारी गोष्ट करा. 

5/7

व्यायाम करा

दिवसातून थोडा वेळ व्यायाम करा, कधी वॉकवर जा, योगा किंवा काही एक्सरसाइज करा. एक्सरसाइज केल्यानं शरिरात एन्डोर्फिन नावाचं हार्मोन रिलीज होतं जेणे करून तुमचा मूड चांगला राहिल आणि तुमचं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहिलं. 

6/7

पॉजिटिव्ह सेल्फटॉक

जर वाईट विचार येत असतील तर चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जर तुमच्यासोबत असं कोणी नसेल की जो तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवत नसेल तर सेल्फ टॉक करा. 

7/7

सेल्फ टॉक कसं कराल?

तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. स्वत:शी चांगल्या गोष्टींवर बोला ज्यानं तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.