'या' तारखेला लाँच होणार iPhone15; आताच करा पैशांची जुळवाजुळव

Apple iPhone15: तुम्हीही येत्या काळात मोबाईल घ्यायचा विचार करताय का? ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, कारण अवघ्या काही दिवसांतच आयफोनचं नवं मॉडेल तुमच्या हातात असणार आहे.   

Aug 30, 2023, 10:33 AM IST

Apple iPhone15: अनेक मोबाईल प्रेमींचं स्वप्न असतं की एकदातरी स्वत:च्या पैशांनी आयफोन खरेदी करायचा. कारण, अनेकांसाठी हा आयफोन म्हणजे स्टेटस सिम्बॉल. 

1/7

प्रोडक्ट अपग्रेड इवेंट

Apple to launch iPhone 15 on September 12 Check latest update and details

Apple iPhone15: जगातील बहुप्रतिक्षित प्रोडक्ट अपग्रेड इवेंटपैकी एक असणाऱ्या अॅपलच्या इवेंटची अधिकृत घोषणा अखेर करण्यात आली आहे. अॅपलच्या अधिकृत संकेतस्थळापासून त्यांच्या ईमेलद्वारे यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 

2/7

12 सप्टेंबर

Apple to launch iPhone 15 on September 12 Check latest update and details

12 सप्टेंबरला हा कार्यक्रम पार पडणार असून, त्यामध्ये आयफोन 15 आणि अॅपलची नेक्स्ट जनरेशन स्मार्टवॉच लाँच करण्यात येणार आहेत. यावेळी अॅपलकडून नव्या इवेंटच्या निमित्तानं 'Wonderlust' ही टॅगलाईन ठेवण्यात आली आहे.   

3/7

कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडणार

Apple to launch iPhone 15 on September 12 Check latest update and details

12 सप्टेंबरला हा इवेंट आंतरराष्ट्रीय वेळएनुसार सकाळी 10 वाजता पार पडणार आहे. कॅलिफोर्नियातील अॅपलच्याच स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडणार आहे.   

4/7

मागील तीन महिन्यांमध्ये...

Apple to launch iPhone 15 on September 12 Check latest update and details

मागील तीन महिन्यांमध्ये अॅपलचा समाधानकारक खप झालेला नाही. त्यातच वापरकर्त्यांच्या मागण्या पाहता नव्या प्रोडक्ट लाँचचं दडपण अॅपलवर असणार आहे.   

5/7

प्रमुख आकर्षणाचा मुद्दा

Apple to launch iPhone 15 on September 12 Check latest update and details

अॅपलच्या या इवेंटमध्ये iPhone 15 च प्रमुख आकर्षणाचा मुद्दा ठरणार आहे. जिथं अॅपलच्या फोनचे दोन एँट्री लेवल आणि दोन हाय एंड मॉडेल समाविष्ट असतील.

6/7

रिअर कॅमेरा

Apple to launch iPhone 15 on September 12 Check latest update and details

सूत्रांच्या माहितीनुसार अॅपलचे लो एंड डिवाईस  iPhone 15 आणि 15 Plus म्हणून लाँच करणयात येतील. यामध्ये मागील मॉडेलमधील  A16 chip, डायनॅमिक आयलँड इंटरफेस आणि 48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असेल फोनच्या डिझाईनमध्ये मात्र फारसे बदल करण्यात येणार नाहीत.   

7/7

नव्या फोनची फ्रेम...

Apple to launch iPhone 15 on September 12 Check latest update and details

नव्या फोनची फ्रेम आता स्टीलऐवजी टीयटॅनियमची असून फोनची जाडीही फार कमीच असेल. ज्यामुळं फोनचं वजन आता आणखी कमी असणार आहे. त्यामुळं तुम्ही जर येत्या काळात एखादा चांगलाच फोन घ्यायच्या विचारात असाल तर, अॅपल क्लबमध्येच सहभागी व्हा!