ताजमहलनंतर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सर्वाधिक फोटो काढले जातात; संपूर्ण भरातातूनच नाही तर परदेशातूनही लोक येतात

महाष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाण येथे ताजमहलनंतर सर्वाधिक फोटो काढले जातात.

| Jan 11, 2025, 17:45 PM IST

Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus :  ताजमहल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात असलेले ताजमहल हे सात आश्चर्यांपैकी एक आहे. देशातूनच नव्हे  जगभरातून पर्यटक ताजमहल पाहण्यासाठी येतात आणि येथे फोटो काढतात. महाराष्ट्रातही एक असे ठिकाण आहे जिथे ताजमहलनंतर सर्वाधिक फोटो काढले जातात.

1/8

महाष्ट्रातील हे ऐतिहासिक ठिकाण ताजमहलला टक्कर देते. ताजमहलनंतर सर्वाधिक फोटो येथेच काढले जातात.  

2/8

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक देशातील जग प्रसिद्ध पर्यटनस्थळांपेक्षा जास्त लोकप्रिय आहे. 

3/8

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. येथून राज्यात अनेक ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन मिळतात.  

4/8

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एका महलासारखे आहे. या रेल्वे स्थानकात 18 फलाट असून फलाट क्र. 1 ते 7 येथे मुंबई उपनगरी लोकल धावतात. तर, फलाट क्र. 8 ते 18 हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर तसेच जलद ट्रेन धावतात.

5/8

 20 जून 1887 या दिवशी ब्रिटिश सम्राज्ञी व्हिक्टोरिया च्या राज्याभिषेकास 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे रेल्वे स्थानक बांधण्यात आले.

6/8

2004 मध्ये UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश झाला आहे.  

7/8

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) असे या रेल्वे स्थानकाचे नाव आहे. अनेक परदेशी पर्यटक आवर्जून या रेल्वे स्थानकाला भेट देतात. 

8/8

महाराष्ट्रातील हे सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण कोणते पर्यटनस्थळ नसून मुंबईतील एक रेल्वे स्थानक आहे. मात्र, अनेकजण खास फोटो काढण्यासाठी येथे येतात.