S*x वर्करच्या भूमिकेनं रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सध्या गंभीर आजारपणाशी देतेय झुंज; पैशांचीही चणचण, कोण आहे ती?
Entartainment News : असं कोणासोबतही घडू नये... या आघाडीच्या अभिनेत्रीविषयी वाचून तुम्हीही असंच म्हणाल
Entartainment News : कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकारांनी बहुविध भूमिका साकारल्या, काही कलाकारांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. पण, काहींना मात्र नशीबानं वाईट दिवस दाखवले.
1/7
या अभिनेत्रीला ओळखता येतंय का?
2/7
आजारपण
या अभिनेत्रीचं नाव आहे रेहाना सुल्तान. सध्या रेहाना रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिथं त्यांचा कार्डिेएक वॅल्व बदलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. इंडियन फिल्म एंड टेलीविजन डायरेक्टर एसोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांच्या मदतीसाठी जावेद अख्तर, रोहित शेट्टी आणि तौरानी यांनी पुढाकार घेतल्याचंही पंडित म्हणाले.
3/7
बालपण
रेहाना सुल्तान मुळच्या उत्तर प्रदेशातील अलाहबादच्या. त्यांचे वडिल विद्युत उपकरणं विक्रीचं काम करायचे. अतिशय सामान्य वस्तीत त्यांचं बालपण गेलं असलं तरीही त्यांनी स्वप्न मात्र कायमच मोठी पाहिली. त्यांनी पुण्यातील अभिनय शाळेतून कलेचं शिक्षण घेत पदवी मिळवली आणि 1967 मध्ये विश्वनात अयंगर यांच्या 'शादी की सालगिरह' चित्रपटात काम केलं. यानंतर त्यांना बीआर इशारा यांच्या 'चेतना' चित्रपटाची ऑफर मिळाली.
4/7
भूमिका
रेहाना यांच्या कारकिर्दीमध्ये मैलाचा दगड ठरला तो म्हणजे 'चेतना' हा चित्रपट. इथं त्यांनी S*x वर्करची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळं त्या रातोरात प्रसिद्धीझोतात आल्या. या चित्रपटाच्या वेळी त्यांचं वय अतिशय कमी असल्यामुळं त्यांची ही भूमिका विशेष गाजली आणि त्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत गणल्या गेल्या.
5/7
पुरस्कार
1970 मध्ये रेहाना यांनी राजेंद्र कुमार यांच्या 'दस्तक'मध्येही काम केलं. याच चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. सलग दोन चित्रपटांमधील बोल्ड दृश्यांमुळे रेहाना चर्चेचा विषय ठरल्या होत्या. पण, पुढे हीच त्यांची ओळख झाली आणि त्यांनी अनेक बोल्ड पात्र नाकारली. त्यानंतर मात्र रेहाना यांचा संघर्षाचा काळ सुरू झाला.
6/7
प्रेक्षपसंती
'मन तेरा तन मेरा', 'तन्हाई', 'हार जीत', 'प्रेम पर्वत', 'खोटे सिक्के', 'एजेंट विनोद', 'बंधन कच्चे धागों का', 'किस्सा कुर्सी' या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना फारशी प्रेक्षकपसंती मिळाली नाही. रेहाना यांनी 16 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या दिग्दर्शकाशी लग्न केलं आणि त्यानंतर कलाजगतातून त्या हळुहळू दिसेनाशा झाल्या.
7/7