अनिल कपूरच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट, यावर दुसरा चित्रपट बनला नाही, तुम्ही पाहिला आहे का?

Anil Kapoor Biggest Hit Film: अनिल कपूरने 40 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आम्ही त्याच्या एका हिट चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्या  चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

| Sep 26, 2024, 16:03 PM IST
1/6

हमारे तुम्हारे

अनिल कपूरने 'हमारे तुम्हारे' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर अनिल कपूरने आपल्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातील बहुतेक हिट ठरले. 

2/6

दुसरा चित्रपट हिट

अनिल कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर नफा कमावला आहे. अनिल कपूरचा त्याच्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट सर्वात हिट ठरला. या चित्रपटातून खूप कमाई केली होती. 

3/6

बेटा चित्रपट

1992 मध्ये प्रदर्शित झालेला अनिल कपूरचा सर्वात हिट चित्रपट 'बेटा' हा आहे. जो अनिल कपूरच्या करिअरमधील दुसरा हिट चित्रपट ठरला. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट प्रचंड आवडला. 

4/6

हिट जोडी

या चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासह अरुणा इराणी, अनुपम खेर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे कलाकार होते. या चित्रपटातील अनिल कपूर आणि माधुरीची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. 

5/6

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची कथा आणि गाणी देखील खूप हिट झाली. जी आज देखील लोकांच्या मनात घर करून आहेत. 

6/6

फ्रीमध्ये पहा चित्रपट

तुम्हाला देखील अनिल कपूरचा हा चित्रपट बघायचा असेल तर यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. या चित्रपटाची कथा आणि गाणी देखील खूप छान आहेत.