विक्रोळी, चेंबूर दुर्घटनेतील थरारक फोटो; 24 जणांचा मृत्यू

रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक  

Jul 18, 2021, 15:25 PM IST

रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे, विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे तर पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे.

1/6

चेंबूरमध्ये  भिंत कोसळल्यामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.  

2/6

विक्रोळीमध्ये 6 जणांनी आपले प्राण गमावले आहे.   

3/6

जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे  

4/6

रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये.   

5/6

पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे.   

6/6

दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहे.