तब्बल 2000 कोटींचा मालक, AR Rahaman पत्नी सायरा बानोला किती पोटगी देणार?

संगीतकार एआर रहमान आणि सायरा बानो यांनी घटस्फोट घेतला आहे. 29 वर्षांचा संसार मोडून या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 कोटी रुपयांचा मालक असलेला रहमान आता Ex पत्नीला किती पोटगी देणार? 

एआर रहमानने 19 नोव्हेंबर रोजी पत्नी सायरा हिला घटस्फोट दिला आहे. एआर रहमानच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. 29 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. यावर त्यांच्या मुलांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर एआर रहमान Ex पत्नीला किती पोटगी देणार याबाबत प्रश्न विचारला जात आहे. यावर वकिल वंदना शाह यांनी उत्तर दिलं आहे. 

1/7

 ए आर रहमानचे 1995 मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना तीन मुले आहेत. एआर रहमानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्टनुसार, एआर रहमानची एकूण संपत्ती सुमारे 1728 कोटी रुपये आहे. 

2/7

दरम्यान, एआर रहमानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सायराला किती रक्कम मिळणार हा मोठा प्रश्न आहे. मुस्लिम समाजातील तलाकबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 

3/7

इस्लाममध्ये विवाह हा एक करार आहे ज्या अंतर्गत हुंड्याची रक्कम निश्चित केली जाते. ज्याला 'मेहर' असे म्हणतात. हुंड्याच्या रकमेबाबत नियमित कागदपत्रे तयार केली जातात. 

4/7

त्या कागदपत्रांवर दोन्ही पक्षांच्या सह्या आहेत. लग्न मोडल्यास किंवा घटस्फोट झाल्यास महिलेला हुंडा ही रक्कम मिळते. अशा परिस्थितीत सायराने एआर रहमानपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिला हुंड्याचीच रक्कम मिळणार आहे. 

5/7

मात्र, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 10 जुलै 2024 च्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की मुस्लिम महिला तिच्या पतीकडून भरणपोषण घेण्यास पात्र आहे.  

6/7

त्यानुसार सायरा बानो एआर रहमानच्या 2000 कोटी रुपयाच्या संपत्तीमधून अर्धा हिस्सा घेऊ शकते. वकिलाने सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, रहमान आणि सायरा यांच्यात अद्याप एलिमनीवरुन कोणतीही चर्चा झालेली नाही

7/7

पण आता वकिल वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान आणि सायनाने एकमेकांना भावनात्मक ताण, मतभेद यावरुन घटस्फोट दिला आहे. त्यामुळे ती कोणतीही पोटगी मागणार नसल्याच सांगितलं आहे.