Viral News: ...अन् तरुणाने थेट रेल्वे स्थानकावर घातली SUV, VIDEO व्हायरल

Viral News: आग्र्यात (Agra) एका तरुणाने इन्स्टाग्राम रीलसाठी (Instagram Reel) थेट रेल्वे स्थानकावर (Railway Station) गाडी घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत रेल्वे स्थानकात ट्रेन थांबलेली असून, प्रवासीही दिसत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.   

Mar 16, 2023, 19:36 PM IST

 

 

1/6

आग्र्यात एका तरुणाने रील बनवण्यासाठी थेट रेल्वे स्थानकावर SUV घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

2/6

तरुणाने आग्रा कँट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर MG Hector कार नेली आणि त्याचा व्हिडीओही शूट केला.   

3/6

दरम्यान, यावेळी प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबलेली होती तसंच अनेक प्रवासीही होते. यामधील काही प्रवासी खाली झोपलेले असताना तरुण मात्र निर्धास्तपणे कार चालवत होता.   

4/6

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुनील कुमार नावाच्या एका तरुणावर कारवाई केली आहे.   

5/6

8 मार्चला रात्री 11.30 वाजता ही घटना घडल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सुरक्षेत त्रुटी झाल्याने ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.   

6/6

SUV रेल्वे स्थानकावर नेमकी कशी पोहोचली अशी चर्चा सुरु असून याप्रकरणी काही रेल्वे कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.