नवी दिल्ली : शाओमीनं आपला नवीन स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन ‘रेड मी-1’ बाजारात उतरवलाय. ऑनलाईन सेलिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर हा मोबाईल आजपासून विक्रीला उपलब्ध झालाय.
या फोनसाठी जवळपास एक लाख लोकांनी अगोदरपासूनच रजिस्टर केलंय. ‘गुगल नेक्सस 4’ या स्मार्टफोनमध्ये दिसणारे हार्टवेअर स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनमध्ये अत्यंत कमी किंमतीत ‘रेड मी-1’मध्ये उपलब्ध झालेत.
कंपनीनं सध्या, 38 हजार युनिट विक्रिसाठी उपलब्ध करून दिलेत. हा लिमिटेड स्टॉक लक्षात घेता कंपनीनं प्रत्येक रजिस्टर्ड ई-मेल आयडीला एकच मोबाईल उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलंय.
या स्मार्टफोनमध्ये कोर्टेक्स –ए7 सहीत 1.6 गिगाहर्टझ क्वॉड कोअर क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर आणि अँन्ड्रेनो 305 इमेज प्रोसेसर उपलब्ध आहे. तसंच या फोनमध्ये 8 जीबी फ्लॅश मेमरी दिली गेलीय. 4.7 इंचाचा डिस्प्ले (1280 X 720 रिझॉल्युशनसहीत) यात उपलब्ध आहे.
‘रेड मी-1’मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 1.6 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनची ऑनलाईन किंमत 5,999 आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.