मुंबई : स्मार्टफोनचे चाहते श्योमीच्या पॉवरफुल एमआय ६ प्लसची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी बॅड न्यूज आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी हा स्मार्टफोन लाँच करणार नसल्याचे समजतेय.
या स्मार्टफोनच्या जागी कंपनी श्योमी एमआय नोट३ हा स्मार्टफोन लाँच करु शकते. या वर्षाच्या तिमाहीत हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. चीनमधील सोशल मीडिया वेबसाईट वीबोवर याबाबतची बातमी आलीये.
दरम्यान, श्योमी एमआय ६ लाँच न करण्यामागचे कारण समजू शकलेले नाहीये. वीबोवर जरी एमआय ६ हा फोन लाँच न होणार असल्याची बातमी असली तरी अद्याप कंपनीकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाहीये. त्यामुळे कंपनी याबाबतचे अधिकृत विधान करत नसल्याने ही अफवा मानली जातेय.