मुंबई : ५००, १००० रूपयाच्या नोटबंदीनंतर, आपल्याला एटीएमची खूप आठवण येतेय, अगदी व्हॉटस अॅप पेक्षाही जास्त. बँकिंग क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या एटीएम म्हणजेच ऑटोमेटेड टेलर मशीनचा शोध ज्याने लावला होता, त्या जॉन शेफर्ड बॅरन यांचा जन्म २३ जून १९२५ रोजी भारतात झाला होता.
जॉन शेफर्ड बॅरन यांना अंघोळ करताना एटीएमची कल्पना सुचली, आणि त्यांनी ती अंमलात आणत लंडनमध्ये, १९६७ साली पहिलं एटीएम सुरू केलं. तेव्हा त्याला 'होल इन द वॉल' म्हणत होते.
मात्र तेव्हा प्लास्टिक कार्डचा पैसे काढण्यासाठी उपयोग होत नव्हता, तर त्यासाठी चेकचा वापर होत असे. चेकला कार्बन १४ लावण्यात आला होता, तो मशीनला ओळखत असे, यानंतर पर्सनल आयडंटिफिकेशन नंबर टाकल्यानंतर पिनची चाचणी होत होती. मशीनमधून तेव्हा जास्तीत जास्त १० पाऊंड काढता येत होते.
आजचा एटीएम पिनकोड ४ अंकी असतो, तेव्हा देखील जॉन शेफर्ड बॅरन यांनी तो ४ अंकीच ठेवला कारण, त्यांच्या पत्नीला ६ अंकी नंबर लक्षात राहत नव्हता. बॅरन हे मूळचे स्कॉटलँडचे होते, त्याचे वडील उत्तर बंगालच्या चटगाव पोर्ट कमिश्नर्सचे चीफ इंजीनिअर होते. २०१० साली जॉन यांचा मृत्यू झाला.