मुंबई: व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइप यासारख्या अॅप्सवरून करता येणारे डोमेस्टिक कॉल्स आता फ्री राहणार नसून त्यालासुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत.
उच्चस्तरीय सरकारी समितीनं नेट न्युट्रॅलिटीच्या सिद्धांताचं समर्थन केलं आहे. पण या शिफारसीमुळं व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइप वापरणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ही शिफारस लागू केल्यानंतर व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइपसारख्या अॅप्सवरून करता येणारे इंस्टंट मॅसेजेस आणि इंटरनॅशनल कॉल्सची सेवा फुकट मिळणार आहे.
व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइपसारख्या ओव्हर द टॉप (ओटीटी) असणारे अॅप्स इटरनॅशनल कॉल्स आणि मॅसेजेस उपलब्ध करून देऊ शकतात. पण लोकल आणि नॅशनल लाँग डिस्टेंस (एनएलडी) कॉल्स पुरवायला या कंपन्यांना लायसन्स घेणं अनिवार्य होईल.
१०० पानी असलेल्या या अहवालात नेट न्युट्रॅलिटीचं पालन करणं अनिवार्य असल्याचं नमुद केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.