पाटणा : कोणत्याही महिलेला तिच्या मोबाईलवर सतत मस्करी म्हणून जरी मिस्डकॉल येत असेल, तर तो देखिल मिस्डकॉल देणाऱ्याला महागात पडणार आहे.
महिलांच्या तक्रारीवर पोलीस या घटनेचा तपास करू शकतात आणि त्या व्यक्तीला जेलमध्ये जाण्याची शिक्षादेखील होऊ शकते.
बिहार येथील अपर पोलीस महानिदेशक अरविंद पांडे यांनी सगळ्या एसपी आणि जीआरपींना आदेश दिला आहे की कोणत्याही महिलेला असे सतत मिस्डकॉल येणे हे खुप गंभीर प्रकरण आहे. त्याचवर योग्य तो तपास करणे खूप महत्वाचे आहे.
काही ठिकाणी पोलीस अधिकारी हे दुर्लक्ष करू शकतात म्हणजे जिथे एक किंवा दोन मिसकॉल आले असतील त्यावर तुम्ही कारवाइ करू शकत नाही. जर सतत मिस्डकॉल येत असतील तरच त्या आरोपीला अटक होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.