टोयोटाची नवी कार 'यारिस', एक लीटरमध्ये धावणार ३४ किमी

जपानची कार निर्माता कंपनी टोयोटा मोटार कॉर्पोरेशनने आपली नवी हॅचबॅक कार विट्झ म्हणजेच यारिस(Yaris)) ही नवी कार लाँच केलीये.

Updated: Jan 19, 2017, 09:43 AM IST
टोयोटाची नवी कार 'यारिस', एक लीटरमध्ये धावणार ३४ किमी title=

नवी दिल्ली : जपानची कार निर्माता कंपनी टोयोटा मोटार कॉर्पोरेशनने आपली नवी हॅचबॅक कार विट्झ म्हणजेच यारिस(Yaris)) ही नवी कार लाँच केलीये.

बाजारात हायब्रिड गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता या कारचे कॉम्पॅक्ट हॅचबॅक हायब्रिड व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आलीये. यामध्ये १.५ लीटर हायब्रिड सिस्टम इम्प्व्हूड कंट्रोल इंजिन, मोटर, इनर्व्हटर आणि इतर भाग आहेत. कंपनीच्या माहितीनुसार या नव्या कारचा मायलेज ३४.४ किमी प्रति लीटर इतका आहे. टोयोटाची ही नवी कार मायलेजच्या बाबतीत इतर कारच्या तुलनेत नक्कीच सरस ठरु शकेल.

पर्यावरणाचा विचार करता जपानमध्ये इको गाड्यांना अधिक प्रोत्साहन तसेच सबसिडी देण्याबाबतचा विचार केला जातोय. महिन्याला ९ हजार गाड्या विकण्याचे टोयोटाचे लक्ष्य आहे. लुक्स आणि डिझाईन पाहता विट्झ कारचा लुक स्पोर्टी दिसतो.