नवी दिल्ली : हिंदी आणि अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीचा इमेल आयडी हॅक करून तिचे काही प्रायव्हेट फोटो चोरी गेलीची घटना घडली आहे.
या अभिनेत्रीने या संदर्भात एफआरआर दाखल केली आहे. हॅकरने फोटोशॉपमध्ये काही आपत्तीजनक स्थितीत तिचे फोटो तयार करून तिच्याच फेसबूक अकाउंटवर पोस्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गूगल आणि फेसबूक यांची मदत घेतली आहे.
ही घटना दक्षिण दिल्लीच्या हौस खासमध्ये घडली आहे. या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटातही काम केले आहे तसेच टीव्हीवर अनके जाहिरातीत दिसते. ती दिल्लीचा फॅशन शोही जिंकली आहे.
तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की काही दिवसांपूर्वी फेसबूक मेसेंजवर एक दोस्त भेटला. त्याने सांगितले की माझ्या फोन बूकमधून सर्व नंबर डिलीट झाले आहेत. तुझा नंबर दे. त्यानंतर मी त्याला नंबर दिल्याचे अभिनेत्री सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा पुन्हा मेसेज आला की माझ्या मोबाइलवर जीमेल ओपन होत नाही. माझ्या कडे व्हेरिफिकेशन एक्सेप्ट होत नाही. त्यामुळे ६ क्रमांकाचा व्हेरिफेकेशन तुझा मोबाईलवर पाठवतो तो मला पाठव.
व्हिरिफेकेशन कोड दिल्यावर अभिनेत्रीला एक नोटीफिकेशन आले की तिचा जीमेलचा पासवर्ड चेंज झाला आहे. त्यानंतर तिला काही वेळात आपल्या फेसबूक पेजवर काही आपत्तीजनक फोटो पाहायला मिळाले. हे फोटोशॉप करण्यात आले असल्याचे अभिनेत्री म्हटली.
अभिनेत्रीने आपल्या मित्रावर राग काढण्यासाठी फोन केला तेव्हा त्याने सांगितले की तुझे जीमेल हॅक झाले आहे. असाच प्रकार माझ्यासोबत झाला. मी देखील सायबर क्राइमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यानच्या काळात अभिनेत्रीने आपला जीमेल पासवर्ड बदलला पण तो पर्यंत हॅकरने तिचे फोटो चोरी केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.