जिओची क्षमता दुप्पट

 रिलायन्स जिओने नेटवर्क क्षमतेत वाढ करण्यासाठी एक लाख अधिक मोबाईल टॉवर उभारण्याचा उद्देश ठेवला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 26, 2017, 05:11 PM IST
 जिओची क्षमता दुप्पट title=

 मुंबई :  रिलायन्स जिओने नेटवर्क क्षमतेत वाढ करण्यासाठी एक लाख अधिक मोबाईल टॉवर उभारण्याचा उद्देश ठेवला आहे. 
 
 या नवीन टॉवरमुळे जिओच्या नेटवर्कची क्षमता दुप्पट होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. 
 
 मार्च अखेरपर्यंत रिलायन्स जिओचे १० कोटी ८९ लाख ग्राहक आहेत. प्रत्येक महिन्याला ११० कोटी गीगाबाईट इतके इंटरनेट ट्रॅफिक जिओवर आहे. तर २२० कोटी व्हॉईस आणि व्हिडिओ मिनिट प्रति दिवस असा जिओचा वापर होतो. 
 
 रिलायन्स जिओच्या दाव्यानुसार भविष्याचा विचार करून प्रकल्प तयरा केला आहे. त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने ५ जी लॉन्च करणे शक्य होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. 
 
 रिलायन्स लवकरच फायबर टू होम (एफटीटीएच) या सेवेसाठी प्रकल्पही काही ठिकाणी सुरू करणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.