भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा निगममध्ये भरती

तुमच्यासाठी नवी रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा निगममध्ये ऑफिसर टेक्निकल इलेक्टाँनिक्सच्या १६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 31, 2013, 11:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तुमच्यासाठी नवी रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा निगममध्ये ऑफिसर टेक्निकल इलेक्टाँनिक्सच्या १६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या नोकरीसाठी अर्जदारांनी इलेक्ट्राँनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. किमान वयोमर्यादा ३० वर्षे आहे. अर्जाचा नमुना व तपशीलसाठी एम्प्लाँयमेंट न्यूज च्या ५ ते ११ ऑक्टोबर २०१३ च्या अकांत प्रकाशित झालेली भारत प्रतिकृती मुद्रण-मुद्रा निगमची जहिरात पाहावी.
उमेदवारांनी विहीत नमुण्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक ती कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज डीजीएम (पर्सोनल) सिक्युरिटी प्रिंटींग अँण्ट माइनिंग काँर्पोरेशन ऑफ इंडिया, १६वा मजला, जवाहर व्यापार भवन, जनपथ, नवी दिल्ली, ११०००१ या पत्यावर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहेत. आपले अर्ज ३ नोव्हेबर २०१३ पर्यंत पोहोचले पाहिजेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.