'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक!

व्होडाफोननं आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिलीय. त्यामुळे, आता तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मिळवू शकता.

Updated: Nov 20, 2015, 09:29 PM IST
'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक! title=

दिल्ली : व्होडाफोननं आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिलीय. त्यामुळे, आता तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मिळवू शकता.

'आपला नंबर निवडा' या नावानं व्होडाफोननं आपली ही नवी सुविधा सुरू केलीय. यामुळे आपल्याला आपला आवडता नंबर, जन्म तारीख, गाड्यांचा नंबर यांपैंकी कुठलाही नंबर मिळवण्यासाठी तुम्ही मागणी करू शकता.

अधिक वाचा - भारतीय विद्यार्थ्याला 'गूगल'कडून १.२७ करोडच्या पॅकेजची ऑफर!

सध्या तरी ही योजना केवळ दिल्ली आणि एनसीआरमध्ये लागू करण्यात आलीय.  यामध्ये ग्राहकांना शेवटची पाच नंबर आपल्या पसंतीनुसार निवडण्याची संधी मिळेल. ग्राहक व्होडाफोनच्या ५२ स्टोअर आणि २१३ मिनी स्टोअर या मल्टी ब्रॅन्ड दुकानांवर नवीन व्होडाफोन नंबर खरेदी करताना आपल्या आवडीचा क्रमांक उपलब्ध आहे किंवा नाही याची चौकशी करू शकतात. 

अधिक वाचा - आता किराणा-मेडिकलमध्ये एटीएमची सुविधा

हा क्रमांक उपलब्ध विक्रेत्यांकडून या क्रमांकाचं कार्ड तुम्हाला मिळू शकेल. नंबर सक्रीय करण्यासाठी ग्राहकांना आपली काही ओळखपत्र जमा करावे लागतील. महत्त्वाचं म्हणजे, ही सुविधा प्री पेड आणि पोस्ट पेड दोन्ही ग्राहकांसाठी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.