सावधान! आपण आपला जुना स्मार्टफोन विकला तर नाही...

तुम्ही तुमच्या जुन्या फोनला वैतागले असाल, आणि तो विकून नवीन फोन घेत असाल तर सावधान. तुमच्या जुन्या फोनमधून यूजर डेटा चोरी होऊ शकतो. 

Updated: May 26, 2015, 12:11 PM IST
सावधान! आपण आपला जुना स्मार्टफोन विकला तर नाही...  title=

नवी दिल्ली: तुम्ही तुमच्या जुन्या फोनला वैतागले असाल, आणि तो विकून नवीन फोन घेत असाल तर सावधान. तुमच्या जुन्या फोनमधून यूजर डेटा चोरी होऊ शकतो. 

वेबसाईट 'टेकवीकयूरोप डॉट को डॉट यूके' च्या बातमीनुसार, कॅंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असं आढळलं आहे की, अॅंड्रॉईड फोनमधील जुन्या मालकाचा डेटा मिळवता येऊ शकतो. 

संशोधकांच्या मते, फोनमधील डेटा पूर्णपणे डिस्क एनक्रिप्शनच्या सहाय्यानं सुरक्षित केला असेल, तरीही डेटा मिळवता येऊ शकतो. अॅंड्रॉईडवर चालणाऱ्या बहुतेक फोनमधील यूजर डेटा ज्यामध्ये एक्सेस टोकेन, मेसेज, इमेज आणि अन्य डेटा डिलिट करण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. तज्ज्ञ सुद्धा या त्रुटीबद्दल चिंतीत आहेत की, स्मार्टफोनमधील डेटा डिलिट करणं कठीण असतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.