नवी दिल्ली : फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांच्यात ट्विटरवरुन शाब्दिक चकमक होत असताना दिसतेय. जगातील सर्वात मोठी चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली अलिबाबा लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे, यावरून हे वादंग रंगलं आहे.
'अलिबाबाने भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून भारतीय गुंतवणूकदार स्नॅपडीलने किती वाईट काम केले आहे,' असे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल नाव न घेता स्नॅपडीलला म्हणाले.
भारतातील अनेक ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये अलिबाबाने गुंतवणूक केली आहे. त्यापैकी ई-कॉमर्स कंपनी पेटीएम आणि स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक आहे. तरीही भारतीय बाजारपेठेत स्वतंत्रपणे प्रवेश करणार असल्याची योजना अलिबाबाने केली आहे.
सचिन बन्सल यांच्या ट्विटवर स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल म्हणाले की, मॉर्गन स्टॅनलेने फ्लिपकार्टचे सुमारे 5 अब्ज डॉलर बाजारमूल्य घालवले. त्यामुळे तुम्ही आता भाष्य करण्यापेक्षा फक्त स्वत:च्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा.