लॉस वेगास : आता तुम्ही तारेशिवाय आणि वायरशिवाय तुमचा मोबाईल चार्ज करू शकणार आहात. अमेरिकन कंपनी वाईट्राईसिटीनं एका मॅग्नेटिक रिझोनन्स आधारित हा नवीन फंडा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
ही कंपनी, याच वर्षी अमेरिकन बाजारात या पद्धतीची उत्पादनं सादर करण्याचे प्रयत्न करतेय. कंपनीचे वरिष्ठ उत्पादन संचालक ग्रान्ट रेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजेन्स तंत्रज्ञानाच्या परीक्षण सुरू आहे. आता लवकरच ग्राहकांना विना तारेचा चार्जर उपलब्ध होऊ शकणार आहे. अनेक मोबाईल फोन निर्मात्या कंपन्यांनी रेजेन्स तंत्रज्ञानात रस दाखवलाय... आणि आपला मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी ते या पद्धतीचा वापर करण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत. हे तंत्रज्ञान याच वर्षी अमेरिकन बाजारात दाखल होऊ शकतं.
या तंत्रज्ञानानुसार, उपभोक्ते एका चार्जिंग पॅडवर मोबाईल ठेऊन त्याला चार्ज करू शकतील. या चार्जिंग पॅडमध्ये इंडक्शन कॉयल उपलब्ध असेल. सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, एचपी, इंटेल, क्वॉलकॉम, एनईसी, आसुस, पॅनासोनिक, लेनोवो सारख्या दिग्गज कंपन्यांनी हे तंत्रज्ञान पडताळून पाहायलाही सुरुवात केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.