बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण हवेतच हवे...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २० टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू केला जाणार आहे.

Updated: Nov 19, 2014, 10:56 AM IST
बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण हवेतच हवे... title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २० टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू केला जाणार आहे.

सध्या दहावीची तोंडी परीक्षा २० गुणांची, तर लेखी परीक्षा ८० गुणांची घेण्यात येते. बारावीला ३० गुणांची तोंडी, प्रात्यक्षिक आणि ७० गुणांची लेखी परीक्षा असते. परंतु नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. दहावीच्या तोंडी परीक्षेत विद्यार्थ्याला २० पैकी २० गुण मिळाले आणि तोंडी तरीक्षेत १५ गुण मिळाले तर विद्यार्थी पास होत असे. मात्र, नवीन नियमानुसार असे ३५ गुण मिळालेला विद्यार्थी उत्तीर्ण मानला जाणार नाही. 

विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. परीक्षा पद्धतीमधील बदलाबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हा निर्णय मार्च २०१६च्या परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी घेतला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.