मुलींमध्ये कमरेच्या ए-4 साईझची क्रेझ

मुलींमध्ये कोणत्या साईझची क्रेझ आहे हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल.

Updated: Mar 27, 2016, 09:41 PM IST
मुलींमध्ये कमरेच्या ए-4 साईझची क्रेझ

मुंबई : मुलींमध्ये कोणत्या साईझची क्रेझ आहे हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल, या आधी मुलींमध्ये झिरो साईजची क्रेझ होती, म्हणून मुली आपल्या कंबरेची साईझ अधिक कमी करण्यावर भर देत होत्या, यामुळे अनेक मुलींची तब्येतही बिघडत होती.

आता देखील साईझ ए-4ची मुलींमध्ये क्रेझ आहे, ही साईझ ए-4 कागदावरून पडली आहे. अनेक मुलींनी ए-4 कागद लावून फोटो काढले आहेत.

हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर त्यांच्यावर मुलांनी टीकेचाही भडीमार केला आहे. पण अनेक मुलींना ही ए-4 साईझ आवडते, म्हणून मुलींमध्ये ए-4 साईझची क्रेझ आहे.