विक्री केलेल्या १० लाख मोटारी निस्सानने परत मागविल्या

निस्सान कंपनीने आपल्या १० लाख मोटार कार परत माघारी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार सदोष असल्याचे कारण देत परत मागविण्यात येणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 29, 2014, 02:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जपानच्या निस्सान कंपनीने आपल्या १० लाख मोटार कार परत माघारी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार सदोष असल्याचे कारण देत परत मागविण्यात येणार आहेत.
जपानच्या निस्सान मोटर्सने जगभरात गेल्या दोन वर्षांत विकल्या गेलेल्या १० लाख मोटारी परत मागविणार असल्याचे जाहीर केले. वाहन उत्पादकांकडून सदोष मोटारी ग्राहकांकडून परत मागविण्याची ही सर्वात मोठी घटना आहे.
कारच्या पुढील सीट्सवर बसणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेसाठी बसविलेली एअर-बॅग ही अपघातप्रसंगी काम करण्यास योग्य नसल्याचे आढळून आले आहे. तसे निस्सान या कंपनीने कारण दिले आहे. २०१३ आणि २०१४ मध्ये तयार केलेल्या निस्सानच्या अल्टिमा सेदान, पाथफाइंडर एसयूव्ही, कॉम्पॅक्ट कार सेंट्रा, एनव्ही २०० या मॉडेल्ससह लीफ इलेक्ट्रिक व्हेइकल प्रकारातील तब्बल १० लाख वाहने आहेत.
ब्रिटनमध्ये विकल्या गेलेल्या दीड लाख मोटारी आहेत. मात्र, निस्सानने भारतातूनही सदोष मोटारी परत मागविल्या आहेत की नाही, ते काही स्पष्ट केलेले नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.